
डॉ. नितीन करीर
कोणतेही सरकार धोरणे आखताना आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि शासकीय उद्दिष्टे कशी साध्य होतील याचा विचार करते. प्रभावी धोरणे तयार करणे हे सरकारचे सर्वांत महत्त्वाचे काम असते. कोणत्याही संस्था मग त्या सरकारी असोत वा खासगी, धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीवरच यशस्वी होतात. धोरणे कामाची दिशा ठरवतात, तर कार्यपद्धती ही धोरणे दैनंदिन कामकाजात कशी राबवावी याची दिशा ठरवते. या दोन बाबींमध्ये बऱ्याचजणांचा गोंधळ उडतो. म्हणूनच धोरण जाहीर होताच लोक तातडीने सरकारकडून त्याबरहुकूम वेगाने कामे होण्याची अपेक्षा करतात.