Pickle Recipe : उन्हाळ्यात करा हे आंबट गोड लोणच्यांचे हे प्रकार

कच्च्या कवठाचे लोणचे, ओल्या हळदीचे लोणचे, करवंदाचे लोणचे, लिंबू पेस्ट लोणचे..
pickles
pickles Esakal

कच्च्या कवठाचे लोणचे

साहित्य

दहा मोठी कच्ची कवठे, ५०० ग्रॕम साखर, २०० ग्रॕम मीठ, १०० ग्रॕम मोहरीची डाळ, ८-१० लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी बडीशेपेची भरड पूड, १०० ग्रॕम लोणचे मसाला.

कृती

कवठे फोडून आतील गर काढावा. मग ठेचून हातानेच तुकडे करावेत. त्यात साखर व मीठ घालून दोन दिवस ठेवावे. छान रस सुटेल. मग पातेल्यात तेल गरम करण्यास ठेवावे. त्यात लसूण पाकळ्या घालून त्या लालसर होऊ द्याव्यात. मोहरीची डाळ मंद आचेवर आधी भाजून घ्यावी. तेल कोमट झाले, की कवठ सोडून बाकी सर्व साहित्य त्यात घालून मिक्स करावे. तेल गार झाल्यावर कवठाच्या तुकड्यांवर ओतावे. नीट कालवून लोणचे बरणीत भरावे.

ओल्या हळदीचे लोणचे

साहित्य

एक किलो ओली हळद, १०० ग्रॕम मोहरीची डाळ, १ मोठी वाटी साखर, १०० ग्रॕम मीठ, २५ ग्रॕम कच्च्या बडीशेपेची पूड, १०० ग्रॕम लोणचे मसाला, २०० ग्रॕम तेल, १० ते १५ लसूण पाकळ्या, दहा ते पंधरा मोठ्या लिंबांचा रस.

कृती

हळद बत्त्याने ठेचावी व हाताने तुकडे करावेत. त्यात मीठ, साखर व लिंबाचा रस घालून दोन दिवस ठेवून द्यावे. छान रस सुटेल. मग कढईत तेल गरम करावे. त्यात लसणाच्या पाकळ्या घालून लाल होऊ द्याव्यात. नंतर गॕस बंद करावा. मोहरीची डाळ तेलावर भाजून घ्यावी. तेल गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ, बडीशेप पावडर, लोणचे मसाला घालावा. गार झाल्यावर तेल हळदीत ओतावे. नीट कालवून बरणीत भरावे.

करवंदाचे लोणचे

साहित्य

एक किलो करवंदे, १०० ग्रॕम मोहरीची डाळ, १ मोठी वाटी साखर, १०० ग्रॕम मीठ, २५ ग्रॕम कच्च्या बडीशेपेची पूड, १०० ग्रॕम लोणचे

मसाला, २०० ग्रॕम तेल, दहा ते पंधरा लसूण पाकळ्या.

कृती

करवंदे बत्त्याने ठेचावीत व हाताने तुकडे करावेत. त्यात मीठ, साखर घालून दोन दिवस ठेवावे. छान रस सुटला, की कढईत तेल गरम करावे. त्यात लसणाच्या पाकळ्या घालून लाल होऊ द्याव्यात. मग गॕस बंद करावा. मोहरीची डाळ तेलावर भाजून घ्यावी. तेल गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ, बडीशेप पावडर, लोणचे मसाला घालावा. हे तेल गार झाल्यावर करवंदात ओतावे. नीट कालवून बरणीत भरावे. टीप करवंद हलक्या हाताने ठेचून तुकडे न करता आख्खीही ठेवता येतील.

लिंबू पेस्ट लोणचे

साहित्य

पन्नास लिंबे, १ किलो साखर, मीठ, १ पाकीट कैरी लोणचे मसाला (लिंबू लोणचे मसाला वापरू नये. लोणचे जास्त आंबट होते).

कृती

लिंबे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. कपड्याने पुसून कोरडी करावीत. लिंबांच्या दोन-दोन फोडी करून घ्याव्यात. सर्वबिया काढून एका भांड्यात रस काढावा. सालीचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यावे. त्यात मीठ, साखर व लोणचे मसाला मिसळावा. मग रस घालून नीट कालवावे. आणखी गोड हवे असल्यास आणखी साखर घालावी. जॕमसारखे मस्त गोड लोणचे तयार होईल. तयार लोणचे बरणीत भरून ठेवावे. टीप ताजे लोणचे काही दिवस रोज हलवावे.

आवळा लोणचे

साहित्य

एक किलो आवळे, १ किलो साखर, २ चमचे लोणचे मसाला, चमचाभर मीठ.

कृती

प्रथम आवळे स्वच्छ धुऊन, पुसून कोरडे करावेत. मग ते आवळे कुकरच्या डब्यात ठेवून पाणी न घालता वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यातील बिया काढून स्मॕशरने रगडावेत. कढईत साखर घालून मंद आचेवर शिजू द्यावेत. चांगले पाकावर आले, की गॕस बंद करावा. त्यात मीठ व लोणचे मसाला घालावा. नीट हलवून गार झाल्यावर लोणचे बरणीत भरावे. खाण्यापुरते वर ठेवून बाकी फ्रीजमध्ये ठेवावे. वर्षभर टिकते

समुद्र सोख ग्रीन चाट

साहित्य

पाच ते सहा समुद्र सोखाची पाने, १ कप चणा डाळीचे पीठ, धने- जिऱ्याची पूड, १ चमचा हिरवी मिरची-लसूण पेस्ट, हळद, मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल.

सजावटीसाठी कपभर गोड दही, पुदिना चटणी, चिंच चटणी, १ चमचा डाळिंब दाणे, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव.

कृती

समुद्र सोखाची पाने धुऊन घ्यावीत. चणा डाळीचे पातळसर पीठ भिजवावे. त्यात मिरची-लसूण पेस्ट, हळद, मीठ, सोडा, धने-जिऱ्याची पूड घालावी आणि नीट कालवावे. कढईत तेल गरम झाल्यावर एकेक पान पिठात बुडवून तेलात तळून घ्यावे. तळलेली पाने प्लेटमध्ये ठेवावीत. त्यावर दही घालावे. पुदिना, चिंच चटणी घालावी. शेव भुरभुरावी. कोथिंबीर व डाळिंब दाणे घालून खायला द्यावे. चटपटीत समुद्र सोख ग्रीन चाट तयार.

pickles
Leap Year: जेव्हा २९ फेब्रुवारी नव्हता तेव्हा होत्या दोन २८ फेब्रुवाऱ्या.! काय आहे २९ फेब्रुवारीचा इतिहास जाणून घ्या

मिसळीचे थालीपीठ

साहित्य

एक किलो गहू, २ वाट्या ज्वारी, १ वाटी चणा डाळ, १ वाटी मूग डाळ, १ वाटी मटकी सर्व एकत्र दळून आणावे. २ टोमॅटो, २ कांदे, ८-१० लसूण पाकळ्या, १ वाटी चिरलेला पालक, १ वाटी कोथिंबीर, ८-१० हिरव्या मिरच्या (या सर्व साहित्याची पेस्ट करून घ्यावी), मीठ, हळद, लाल तिखट, १ चमचा ओवा, अर्धी वाटी तीळ.

कृती

पालकाच्या पेस्टमध्येतिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ घालावेत. त्यात बसेल एवढे पीठ घालून मळावे. लहान लहान थालीपिठे थापून खमंग भाजावीत.

कुरडयांची भाजी

साहित्य

दोन वाट्या कुरडयांचा चुरा, १ मोठा चमचा तेल, १ चिरलेला कांदा, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा लाल तिखट, हळद, मीठ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ७ ते ८ कढीलिंब पाने.

कृती

कुरडयांचा चुरा दोन-तीन तास भिजत घालावा. नंतर चाळणीत नितळायला ठेवावा. कढईत तेल तापवावे. तेल तापल्यावर मोहरी, जिरे घालावे. तडतडल्यावर कांदा मंद आचेवर परतावा. त्यात लसूण पेस्ट घालावी. नंतर कढीलिंब पाने घालावीत. लाल तिखट, हळद, कुरडयांचा चुरा घालून, मीठ घालून परतावे. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.

---------------

pickles
हो, चक्क १२,००० चवींचा चहा..! २०५१ कोटींच्या उद्योगात रूपांतर झालेले स्टार्टअप; ‘चायोस’ची स्फूर्तिदायी कहाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com