

Picky Eater Kids
esakal
माझ्या एका नकारामध्ये मम्माच्या कपाळावर हजार आठ्या पाडण्याची ताकद होती. वैतागलेली मम्मा, आमची झकाझकी, आणि मग तिचं पाचव्या मिनिटाला हार पत्करणं हे असं रोजचं दोन-तीन वेळा होणारं दोन-तीन अंकी नाटक मला वेगळीच ऊर्जा देऊ लागलं. माझी शिंगं मला फील होऊ लागली.
श्रद्धा माणसाला निश्चितच बळ देते, कठीण परिस्थितीत गळून जाऊ देत नाही, आशा दाखवते. आपल्या ध्येयाकडं वाटचाल करत राहायची ताकद देते, मनातल्या भीतीला पळवून लावते, शांत करते, आयुष्य जगण्यासाठी काहीतरी कारण पुरवते. स्वतःपेक्षा मोठं असं काहीतरी परिमाण जगण्याला पुरवते. हे सगळं जरी अगदी खरं असलं तरी मला मात्र श्रद्धा बळ-बीळ, आशा-बिशा असलं काही न देता चक्क ‘ठेपले’ देते!! तर ही गोष्ट आहे त्याच ठेपल्यांची, ते करणाऱ्या श्रद्धा (आंटी)ची आणि माझी, नीवाची!