संपदा सोवनी
चीनचा हजारो वर्षांचा इतिहास, राजेशाहीकडून कम्युनिस्ट राजवटीकडे झालेली वाटचाल, त्या दोन्ही पातळ्यांवर झालेली दडपशाही याची माहिती देतानाच चीनची आताची आधुनिक जगातील प्रगती आणि वाढत चाललेली जागतिक आक्रमकता समजावून सांगणारे नवीन पुस्तक म्हणजे भिंतीआडचा चीन. नीरस व पुस्तकी भाषा टाळून केलेले हे लेखन चीनवरील मोजक्या मराठी लेखनात उठून दिसणारे आहे.