.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सुजाता राऊत
रामदास खरे आपल्याला परिचित आहेत कवी, चित्रकार आणि कथाकार म्हणून. कथनात्मक साहित्यात त्यांनी गूढकथा हा प्रकार प्रामुख्याने हाताळला आहे. त्यांचा पुस्तक परीक्षणातही हातखंडा आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे स्तंभलेखन त्यांनी केलेले आहे. यानंतर ते कादंबरीसारख्या बृहद्प्रकाराकडे वळले आहेत. द लॉस्ट बॅलन्स ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी यात नवखेपणाच्या खुणा आढळत नाहीत.