Reading Habbit: ‘वाचनसवयी’ चा वारा लागू दे राजसा...

Marathi Literature: कोणतीही गोष्ट सलग एकवीस दिवस केली, की तिचं सवयीत रूपांतर होतं असं म्हणतात. मात्र, माझ्या बाबतीत वाचन या नियमाला अपवाद ठरलं...
reading Habbit
reading HabbitEsakal
Updated on

मयूर भावे

‘वाचन’ म्हटल्यावर डोळ्‍यांसमोर काय येतं? एखाद्या शांत गॅलरीत, झाडाखाली, बैठकीच्या खोलीत, ग्रंथालयात, अभ्यासिकेत किंवा धावत्या रेल्वेत, लोकलमध्ये, विमानात, बसमध्ये किंवा अगदी बिल भरण्याच्या रांगेत वगैरे हातात पुस्तक घेऊन वाचणारी व्यक्ती! वाचन म्हटल्यावर हातात पुस्तक घेऊन वाचणारा जीव ही आकृती अपरिहार्यतेने आपल्या डोळ्यांसमोर येते.

काळानुसार वाचनाची साधने, पर्याय, पद्धती बदलल्या. ई-बुक आली, लॅपटॉप-मोबाईलवर वाचणं शक्य झालं. पुस्तक ‘ऐकता’ही येऊ लागलं. गेल्या १०-१५ वर्षांतला हा बदल सोडला, तरी आजही वाचन म्हटलं, की डोळ्यांसमोर येते ती हातात पुस्तक घेऊन वाचणारी व्यक्ती! अशा वाचनानंदी ‘राजसा’ला लागलेला वाचनसवयीचा ‘वारा’ प्रवाही राहणं आणि इतरांच्या अंगावरूनही तो जाणं हाच वाचनसंस्कृतीचा मूलाधार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com