Premium|Marathi Sahitya Sammelan : १८७८मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा; अध्यक्षांचे अधिकार आणि आजची आव्हाने

Marathi Sahitya Sammelan and Education System :** साहित्य संमेलनाध्यक्षांचे अधिकार, शिक्षणव्यवस्थेतील डोनेशनचा वाढता प्रभाव आणि १८७८मध्ये सुरू झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेचा आढावा
Marathi Sahitya Sammelan

Marathi Sahitya Sammelan

esakal

Updated on: 

मी माझ्या भाषणातून आजच्या काही कळीच्या मुद्द्यांवर प्रश्न मांडले होते. पहिला प्रश्न होता तो आजच्या काळात आपण स्वीकारलेल्या धर्मसंकल्पनेच्या मांडणीबाबतचा; पण आज धर्मावर बोलणे, महाकाव्यांवर बोलणे किती जोखमीचे आहे हे मला ठाऊक होते. त्यामुळे तो मुद्दा विचारासाठी सोडून दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी अधिक गंभीरपणे लक्ष केंद्रित केले होते. तो म्हणजे आजची शिक्षणव्यवस्था. या व्यवस्थेत बोकाळलेल्या डोनेशनचे समंध आणि त्यातून उद्ध्वस्त झालेली तरुण पिढी.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार असतात का? तर त्याचे उत्तर चक्क ‘नाही’ एवढेच आहे. फक्त तो त्या वर्षी साहित्य महामंडळाचा पदसिद्ध सदस्य असतो एवढेच. त्याच्या अधिकारांचा विचार करायचा झाला, तर त्याला असे काही अधिकार हवेत, असे मी म्हणेन. साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय कारकिर्दीची माझी काही निरीक्षणे, काही विचार, व्यवस्थेतल्या काही त्रुटी लेखाच्या निमित्ताने मला मांडता आल्या. संमेलनाध्यक्षांचा एक प्रतिनिधी म्हणून या क्षेत्राच्या काही नव्या दिशा पुन्हा उजळून निघोत, याच माझ्याही अपेक्षा आहेत.

सन १८७८मध्ये पुण्याच्या हिराबागेत पहिले साहित्य संमेलन, मराठी ग्रंथकार सभा किंवा संमेलन म्हणून लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांच्या पुढाकाराने भरविले होते आणि या संमेलनाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भूषविले होते. त्या वेळी या दोघांपैकी कुणालाही वाटले नसेल, की जवळजवळ दीडशे वर्षांनंतर या सभेचे शंभरावे संमेलन आयोजित होईल, आणि हा संमेलनाचा वृक्ष केवळ मराठी प्रांतापुरातच मर्यादित न राहता तो अखिल भारतीय प्रांतात पसरेल. पण इतिहासात अशा अनेक घटना एखाद्या लहानशा निमित्ताने सुरू होतात आणि त्याचे स्वरूप नंतर इतके समाजव्यापी होते, की ती समाजाची, त्या त्या क्षेत्राची परंपरा, गरज म्हणून उभी राहते. (सार्वजनिक गणेशोत्सवाचे वेगळ्या अर्थाने हेच झाले, असेही दिसून येते.) न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी देशमुखांनी सुरू केलेली ही परंपरा आज मराठी साहित्यविश्वाचा एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. ग्रंथकार, ग्रंथव्यवहार, वाचक आणि मराठी रसिक यांच्यासाठी आज ही परंपरा चळवळीच्या स्वरूपात उभी राहिली आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांशिवाय वेगवेगळ्या नावांखाली, वेगवेगळ्या साहित्यप्रवाहांची शंभरांच्या आत-बाहेर लहान-मोठी साहित्य संमेलने भरवली जातात. महाराष्ट्र हा साहित्य संमेलनाचा प्रांत आहे, असा शिक्का महाराष्ट्रावर बसला आहे.

Marathi Sahitya Sammelan
Premium|SPIC MACAY : भारतीय कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारे ७७ वर्षाचे आयआयटीचे ‘तरूण’ प्राध्यापक..!
Loading content, please wait...