

Martin Luther And Protestantism
esakal
धर्मप्रमुख या नात्याने पोपमहाशयांचे महत्त्व व सामर्थ्यही वाढीस लागले. पण त्याचा त्रास एकीकडे सर्वसामान्य, प्रामाणिक व श्रद्धाळू ख्रिस्ती अनुयायांना होऊ लागला, तसाच तो राजसत्तेला म्हणजे सत्ताधारी राजांनाही होऊ लागला. मात्र त्यावर मात करण्याचा मार्ग सर्वसामान्यांच्या प्रतिनिधीने काढला. या शार्मण्यदेशीय म्हणजे
मनुष्याला मिळालेल्या निसर्गदत्त बुद्धिरूपी देणगीचा म्हणजेच विचारशक्तीचा सदुपयोग करून त्याने एरवी रहस्ये या सदरात जमा होण्यासारखे निसर्गनियम शोधून काढले. या नियमांच्या व्यवस्थेला ‘विज्ञान’ असे नाव आहे. विज्ञानामुळे माणसाला निसर्गातील घटनांचे व प्रक्रियांचे आकलन व स्पष्टीकरण शक्य झाले. इतकेच नव्हे, तर अशा प्रकारच्या घटना परत केव्हा घडू शकतात याचे भाकितही तो करू लागला.