
डॉ. आदित्य केळकर
केनियातल्या मसाई मारा राष्ट्रीय उद्यानामधील जंगल सफारी हा एक अद्वितीय आणि रोमांचक अनुभव आहे. केनियाच्या नैऋत्येकडे असलेलं मसाई मारा सव्हाना प्रकाराचं जंगल आहे. इथले स्थानिक लोक म्हणजेच मसाई त्यांची पारंपरिक वस्त्रं आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहेत.