Medical Tourism SWOT: वैद्यकीय पर्यटनातील बलस्थाने, संधी आणि आव्हाने कोणती?

Medical Field: देशाची बलस्थाने (स्ट्रेंथ्स), त्यातील कमकुवत दुवे (विकनेसेस), संधी (अपॉर्च्युनिटीज्) आणि धोके (थ्रेट्स) यांचा सर्वंकष विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे..
Medical tourism swote
Medical tourism swoteEsakal
Updated on

प्रतिनिधी

भारतात वैद्यकीय पर्यटनाचा झपाट्याने विकास होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने पुढे येणाऱ्या क्षेत्राचे SWOT विश्लेषण म्हणजेच देशाची बलस्थाने (स्ट्रेंथ्स), त्यातील कमकुवत दुवे (विकनेसेस), संधी (अपॉर्च्युनिटीज्) आणि धोके (थ्रेट्स) यांचा सर्वंकष विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

बलस्थाने

  • अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ

  • निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ

  • कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा

  • भाषा व सहज होणारा संवाद

  • आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणित रुग्णालये

  • रुग्णाला फारवेळ प्रतिक्षेत न ठेवता तत्पर आणि दर्जेदार सेवा

  • आधुनिक उपचारांबरोबरच पर्यायी प्राचीन वैद्यकीय सेवा

  • उपचारानंतर रुग्ण आणि त्याच्यासोबत आलेल्यांना पर्यटनाचे विपुल पर्याय

संधी

  • देशातील वैद्यकीय सेवांच्या मागणीत सातत्याने वाढ

  • नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य असणारे प्रशिक्षित डॉक्टर

  • प्रगत देशांमध्ये उपचारांसाठी असणारी मोठी प्रतिक्षा यादी

  • आफ्रिका खंड, मध्य आशियाई देशांमधील दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा अभाव

  • हवाई मार्गांनी जोडलेली देशातील प्रमुख शहरे

  • आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचारांकडे वाढता कल

कमकुवत दुवे

सरकारी पातळीवरील उदासीनता

परदेशातील वैद्यकीय पर्यटन आणि देशातील रुग्णालयांदरम्यान नोडल एजन्सींचा अभाव

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील वैद्यकीय पर्यटनाचा अपुरा प्रचार

‘एनएबीएच’ (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स) आणि ‘जेसीआय’ (जॉइंट कमिशन इंटरनॅशनल) मानांकित रुग्णालयांची अपुरी संख्या

असंघटित क्षेत्र

उपचार खर्चातील एकवाक्यतेचा अभाव

पायाभूत सुविधांचा अभाव

वैद्यकीय विम्यातील पोर्टेबिलिटीविषयक अडचणी

धोके

  • मलेशिया, थायलंड, सिंगापूर अशा आशियाई देशांमधील प्रादेशिक स्पर्धा

  • आंतरराष्ट्रीय रुग्णांना वैद्यकीय विमा मिळण्यात येणारे अडथळे

  • वैद्यकीय पर्यटन प्रमाणित, मानांकित नसल्याने रुग्णांची फसवणूक होण्याची भीती

  • स्थानिक रुग्णांसाठी आरोग्य सेवा महाग होण्याचा धोका

  • कायदेशीर व नैतिक गुंतागुंत

  • वारंवार उद्‌भवणारे साथीचे आणि कीटकजन्य रोग

  • सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com