ऋषिकेश खांदवे
आपल्याकडे पर्यटनाला नैसर्गिक, धाडसी, धार्मिक असे वेगवेगळे कंगोरे आहेत. त्या पर्यटनाच्या संकल्पनेत वैद्यकीय पर्यटन कुठेच बसत नाही. त्यामुळे वैद्यकीय पर्यटन या शब्दातून आणखी गोंधळ वाढतो. रुग्ण बरा नाही म्हणून उपचारासाठी भारतात येतो, तर तो पर्यटन कसा करतो, प्रश्न आपल्याला पडतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध...
वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना आधुनिक काळातील असली, तरीही त्याची पाळेमुळे मानवाच्या प्राचीन इतिहासामध्ये सापडतात. ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये लोक रुग्णांना घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी जात असल्याच्या नोंदी आढळतात.
त्याच पद्धतीने भारतातही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचारांसाठी देशोदेशीचे रुग्ण येत असल्याचे अनेक पुरावे इतिहासाच्या पानापानांमध्ये आहेत. त्यामुळे आधुनिक काळातील वैद्यकीय पर्यटन म्हणजे नेमके काय, हा सर्वांसाठी कुतूहलाचा प्रश्न ठरतो.