Premium| Book Review: निवडक ‘पंच’नामा : अक्षय्य विनोदाचे पाच कुंभ

Panchnama Book: दै. सकाळमध्ये सु. ल. खुटवड यांनी ‘पंच’नामा नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले. वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक लेखांचे पुनर्लेखन म्हणजे ही पाच विभागनिहाय पुस्तके
pachait marathi book
pachait marathi bookEsakal
Updated on

पुस्तक परिचय । डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

विनोदी साहित्यामध्ये सु. ल. खुटवड यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला आहे. विनोदी कथा, लेख, स्तंभलेखन इत्यादी विविध प्रकार त्यांनी यशस्वीरित्या हाताळले आहेत. नुकतीच मेहता पब्लिशिंग हाऊसने त्यांची एकत्रित पाच विनोदी पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, नाट्यपूर्ण घडामोडी, ओघवती आणि चुरचुरीत शैली ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर उपहास आणि उपरोधाची मुक्तहस्ते उधळण यामधून जाणवते.

दै. सकाळमध्ये सु. ल. खुटवड यांनी ‘पंच’नामा नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले. वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक लेखांचे पुनर्लेखन केलेले विस्तारित लिखाण म्हणजे ही पाच विभागनिहाय पुस्तके आहेत. खुटवड यांचे आजवरचे सारे लिखाण वाचकप्रिय अाहे. व्यवसायाने ते पत्रकार असल्याने विविध लोकांशी त्यांचा संपर्क येत असल्याने मानवी मनोवृत्तीचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला आहे. हा अभ्यास ते त्यांना लाभलेल्या नैसर्गिक विनोदबुद्धीच्या वापराने कथेच्या रूपात वाचकांसमोर सहजपणे सादर करतात आणि नकळत जीवनाचे तत्त्वज्ञानही सांगून जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com