Premium|Mere Mehboob 1963 : साहिर म्हणजे जादूगार!

Mere Mehboob Songs and Music : १९६३च्या ‘मेरे मेहबूब’ने संगीत, उर्दू भाषेचा डौल, लखनवी अदब आणि खानदानी संस्कृती पडद्यावर खुलवली; शकील बदायूनींच्या गीतांसह गायक-संगीतकारांच्या योगदानाने सिनेमा अजरामर झाला.
Mere Mehboob Songs and Music

Mere Mehboob Songs and Music

esakal

Updated on

सुलभा तेरणीकर

भारतीय सिनेमाचा मुख्य गाभा मनोरंजन आहे; भारतीय गोष्टीवेल्हाळ लोकांसाठी कथा हासुद्धा गाभा आहे आणि अर्थातच संगीतदेखील. गीतं नसलेल्या चित्रपटाची कल्पनाही सहन होणार नाही. १९६३वर नजर टाकलीत तर शकील बदायूनी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर, हसरत, शैलेन्द्र यांचे शब्द तरुणाईनं आपलेसे केले. मेरे मेहबूब, ताज महाल, फिर वोही दिल लाया हूँ या सिनेमांच्या लोकप्रियतेत कवी, संगीतकार, गायक यांचा वाटा सिंहाचा होता. सहा दशकं उलटून गेली तरी सिनेरसिक गाणी विसरलेले नाहीत!

मे  रे महबूब ही १९६३मधली हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ब्लॉकबस्टर किंवा सुपरडुपर हिट फिल्म होती. संगीत चित्रपटाचं भव्य, सुंदर विश्र्व तर खुलं झालंच, पण उर्दू भाषेचा डौल, मुस्लिम खानदानी कुटुंबांतील संस्कृती आणि लखनवी अदब यांचं लोभस दर्शन घडलं. १९५७च्या तुमसा नहीं देखामधली शम्मी कपूरची नायिका अमीता मेरे महबूबमध्ये एका हृदयस्पर्शी भूमिकेत दिसते. अमीता म्हणजेच कमर सुलताना, मूळची कलकत्त्यात जन्मलेली. तुमसा नहीं देखाच्या आधी ती छोट्या-मोठ्या भूमिका करीत होती. तुमसा नहीं देखामध्ये ती शम्मी कपूर नायिका झाली, तर गूंज उठी शहनाईमध्ये राजेंद्र कुमारची! हे चित्रपट गाजले तरीही दुय्यम भूमिकाच तिच्या वाट्याला आल्या. मेरे महबूबमध्ये तर ती भाव खाऊन गेली. ‘मेरे महबूब में क्या नही’ गाण्यामध्ये पडद्यावर साधना-अमीतानं आणि गायिका म्हणून लता-आशानं मैदान मारलं. राजेंद्र कुमारनं पियानो छेडत पडद्यावर सादर केलेली ‘ऐ हुस्न ज़रा जाग तुझे इश्क जगाये’ आणि ‘तुम से इज़हार-ए-हाल कर बैठे’ ही गाणी तरुणाईला वेड लावून गेली. ‘तेरे प्यार में दिलदार, जो है मेरा हाल-ए-ज़ार’ हे लताचं गाणंं भुरळ पाडत होतं. ‘याद में तेरी जाग जाग के’ हे गाणं ऐकून त्यावेळी कुणाला शकील बदायूनींनी लिहिलेल्या, बेगम अख्तरच्या अजरामर गझलची आठवण झाली... ‘ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’. सिनेमा संगीताचं गारूड हे असं होतं.

Mere Mehboob Songs and Music
Premium|women in Indian cinema : भारतीय सिनेमातील स्त्री; काल, आज आणि उद्याचा प्रवास
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com