Premium|Nifty Struggles : निफ्टी २४५००वर अडकला; स्मॉल कॅप शेअर्स मात्र नवे उच्चांक गाठताहेत

Nifty 24500 : मेटल रिसायकलिंगची वाढती गरज आणि कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी यासोबत निफ्टीतील स्थिरता, संस्थात्मक खरेदी-विक्री आणि स्मॉल कॅप शेअर्सच्या तेजीचे चित्र लेखातून समोर येते.
Nifty Struggles

Nifty Struggles

esakal

Updated on

भूषण महाजन

जगभरात नवीन धातूंचा पुरवठा करणे महाग आणि पर्यावरणीयदृष्ट्या अवघड होत चालले आहे. त्यामुळे मेटल रिसायकलिंग ही पुढील दशकाची मोठी गरज ठरणार आहे. आर्थिक वर्ष २०२६मध्ये कंपनीचा महसूल ४,२६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आणि नफा ३७९ कोटी रुपये झाला. नुकत्याच झालेल्या तिमाहीत महसूल तब्बल ४२ टक्क्यांनी वाढून १,४७५ कोटी रुपये आणि नफा १४ टक्क्यांनी वाढून १०६ कोटी रुपये झाला आहे.

पाहता पाहता एकामागे एक आठवडे व ऑगस्ट महिना संपला, पण आपली निफ्टी काही २४५०० पार करायला तयार नाही. बुल्स आणि बेअर्स आपापल्या जखमांवर फुंकर घालत बसले आहेत. बाजारात काहीच हॉट होत नसल्यामुळे पंटर्सची घालमेल आणि तगमग वाढत आहे. सालाबादाप्रमाणे परदेशी संस्थांची विक्री आणि म्युच्युअल फंडांची खरेदीही सुरूच आहे. पण या रस्सीखेचीत प्रमुख निर्देशांक हलत नाहीत. नाही म्हणायला परदेशी संस्था माफक प्रमाणात तेजीत आहेत, पण कदाचित आपलेच छोटे व मोठे गुंतवणूकदार विक्री करताहेत की काय अशीही शंका येते. स्मॉल कॅप व मायक्रो कॅप शेअर मात्र सर्व बंधने झुगारून नवे उच्चांक करताना दिसत आहेत. भारतीय बाजारात विमनस्क अवस्थेत असलेल्या गुंतवणूकदारांबद्दल असे म्हणता येईल -

न मंदी का दौर है, न तेज़ी का नज़ारा है,

इस गुमराह बाज़ार ने बस, सब्र को पुकारा है

कैंडल हरी हो या लाल, अब तो डर नहीं लगता,

दिल थाम के बैठे है , बस रहगुजर का सहारा है

येथे सब्र म्हणजे संयम, धीर; रहगुजर म्हणजे मार्गदर्शक, रस्ता दाखवणारा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com