भूषण महाजन
जनतेच्या हाती कितीही पैसे दिले तरी वीज निर्मिती, वीज पारेषण, रस्ते बांधणी, पाणी पुरवठा इत्यादी मोठ्या भांडवली खर्चांची कामे सरकारलाच करावी लागतात. त्यातील गुंतवणुकीचा एकास पाच असा कॅस्केडिंग प्रभाव अर्थव्यवस्थेवर होतो. आर्थिक शिस्तीचा अतिरेक न करता, महसुली तूट प्रमाणात ठेवून आठ टक्क्यांवर जीडीपी वृद्धी होईल असे टार्गेट ठेवले, तरच विकसित भारताकडे वाटचाल करता येईल.
सुज्ञ वाचकहो, मागील लेखात (राजा सावध, रात्र वैऱ्याची आहे!, ता. ८ फेब्रुवारी) आम्ही म्हटले होते, की २४ जानेवारीला संपलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला २३२९० अंशावर असलेली निफ्टी २३०९० अंशावर बंद झाली. निफ्टी २०० दिवसांच्या चल सरासरीच्या खाली आहे, आता यापुढील लक्ष्य २२८०० व त्याखाली गेल्यास पुन्हा तपासू.