Donald Trump
Esakal
विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
ट्रम्पच्या संकुचित धोरणामुळे अमेरिकेनेच रचलेल्या या व्यवस्थेची मोडतोड झाली तर त्याचे परिणाम काय होतील, हेही मिलर लक्षात आणून देतात. एकतर ज्यांचा स्वातंत्र्य आणि समता या उदार मूल्यांवर विश्वास नाही, अशांची सत्ता प्रस्थापित होईल किंवा जगात अव्यवस्था होईल, अराजक माजेल.
ट्रुब्लडसारख्या क्वेकरपंथीय ख्रिस्ती माणसाने जागतिक पातळीवरील शांतीचा आग्रह धरावा आणि त्यासाठी आयुष्यभर संस्थात्मक कार्य करीत राहावे, ही बाब खचितच प्रशंसनीय आहे. हा एक आदर्शवादच म्हणावा लागतो. जगभरच्या भ्रातृभावनेला काहीएक आधार किंवा अधिष्ठान असायला
हवे, हे वेगळे सांगायची गरज नाही. हे अधिष्ठान ट्रुब्लडला अर्थातच ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानात सापडले. येशूनेच ईश्वराचे पितृत्व आणि अनुषंगाने मानवांचे भ्रातृत्व यांचा उच्चार केला होता. तो असताना इतरत्र आधार शोधायची गरज नाही, असे या मंडळींना वाटणे स्वाभाविकच होते. एकदा या आधारभूत तत्त्वाचा स्वीकार केला, तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लागणारी यंत्रणा मिशनऱ्यांमार्फत उभी करणे सहज शक्य होते, तसेच जगभरच्या अनेक देशांमध्ये युरोपातील ख्रिस्ती राष्ट्रांनी आपापली वासाहतिक राज्ये निर्माण केलेली असल्याने आवश्यक तो निधी आणि गरज पडलीच तर सत्तेचा वापर शक्यतेच्या कोटीत होता.