

Millets recipes in Marathi
esakal
निर्मला दिलीप साळुंखे
साहित्य
एक वाटी गव्हाचे पीठ, कांदा, जिरे, ३-४ लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर, टोमॅटो, चवीनुसार मीठ.
कृती
प्रथम गव्हाचे पीठ जाडसर दळून कोरडे भाजून घ्यावे. त्यानंतर थोडे तेल घालावे. फोडणी करून तिला उकड द्यावी. एक वाटी पिठाला एक वाटी पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने हलवून घ्यावे. मग एक वाफ येऊ द्यावी. तयार पदार्थ एका डिशमध्ये काढून त्यावर टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव घालावी आणि लिंबू पिळावे. छान चव येते.