
डॉ. अविनाश भोंडवे
स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या सौंदर्याच्या व्याख्येत केसांचे महत्त्व निर्विवाद असते. सुंदर लांबसडक केशसंभार आणि त्याला दिलेले वळण हा केवळ अभिनेत्यांच्याच बाबतीत नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक असतो. त्यामुळेच केस गळणे आणि टक्कल पडणे हा गहन चिंतेचा विषय ठरतो. आजकाल, सोशल मीडियाचा प्रभाव जीवनातल्या सर्वच क्षेत्रात प्रकर्षाने जाणवतो. अनेक रुग्ण इंटरनेट आणि सोशल मीडियावर पाहिलेल्या नावीन्यपूर्ण उपचारांबद्दल विचारण्यासाठी डॉक्टरांकडे जातात.