

Shriram Finance Mitsubishi Deal
esakal
आपला बाजार वर जाईल तो आपल्या कंपन्यांच्या मजबूत कामगिरीवरच! ती अपेक्षा डिसेंबरअखेरच्या तिमाही निकालांनी पूर्ण केली, तर सारे काही आलबेल असेल. अन्यथा पुन्हा पुढच्या तिमाही निकालांची वाट पाहणेच आपल्या हाती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना गनिमी काव्याने तोंड दिले व त्यात बऱ्यापैकी यश मिळवले. मुघल सैन्याचे मात्र एक वेगळे युद्धतंत्र होते. त्याचे नाव ‘सुलतानढवा’. सुलतानढवा म्हणजे निवडक सैन्याने प्राणाची पर्वा न करता केलेला निकराचा हल्ला. सुलतानढव्यात सर्व सैन्य यायलाच पाहिजे असे नाही. सहसा किल्ला जर ताब्यात येत नसेल आणि वेढा घालून झुंजवून किल्ला हस्तगत होत नसेल, तर सुलतानढवा करायचे. म्हणजे निवडक सैन्य शिड्या लावून एखादा बुरूज उडवून लावणार, मग उरलेले सैन्य पाठीमागून हल्ला करणार. तेव्हा सर्व ताकद एकवटून किल्ल्यावर हल्ला केला जातो, त्याला सुलतानढवा म्हणतात!
पुढे मराठ्यांनीदेखील हे तंत्र शिकून घेतले. वाईच्या जवळ एक अवघड आणि म्हणूनच उत्कृष्ट किल्ला होता. किल्ले केंजळगड. या किल्ल्यावर आदिलशाही हुकूमत होती. हा किल्ला स्वराज्यात हवा म्हणून निवडक सैन्यासह महाराज राज्याभिषेक ४० दिवसांवर आला असताना निघाले. मराठी सैन्याने सुलतानढवा केला आणि किल्ला जिंकला.