Premium|Modern Parenting Challenges : आधुनिक पालकत्वाचा वाढता ताण आणि मुलांच्या विकासाचे आव्हान

Helicopter Parenting Effects : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडताना आधुनिक पालक स्वतःच तणावाच्या गर्तेत अडकत आहेत. हेलिकॉप्टर पॅरेंटिंग, अतिनियोजन आणि सततच्या हस्तक्षेपामुळे मुलांबरोबरच पालकांनाही मोठी किंमत मोजावी लागत आहे.
Helicopter Parenting Effects

Helicopter Parenting Effects

esakal

Updated on

आधुनिक पालकत्व खरोखरच जिकिरीचं होत चाललंय! एका बाजूला आपल्या लाडक्या मुलासाठी वाट्टेल ते करायची तयारी आणि दुसरीकडे नोकरी टिकवण्याची धडपड यात आई-बाबांची अवस्था केविलवाणी होते. पण स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी दिवसातून फक्त एक तास जरी काढलात, तरी तुम्ही आनंदी व्हाल. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः आनंदी असाल तरच तुम्ही मुलांना आनंदी ठेवू शकाल.

खरंतर मूल जन्माला आलं की पालकत्व सुरू

होतं. परंतु २००० सालानंतर ‘आधुनिक पालकत्वाचा’ जन्म झाला. त्यातही २०१०नंतर जेव्हा ‘जेन अल्फा’ पिढीतली मुलं जन्माला येऊ लागली तेव्हा, आणि पाठोपाठ कोविडनंतर, आधुनिक पालकत्वा चे ताणतणाव जाणवू लागले. पूर्वी कसं, संगोपन, शिक्षण आणि शिस्त या तीन शब्दांतच पालकत्व संपत होतं. पण आता आधुनिक जगतात पालकत्वाच्या गरजा आणि अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. नेहमी मुलांच्या विकासाबद्दल, मानसिकतेबद्दल बोललं-लिहिलं जातं. आज आपण मुलांना वाढवताना पालकांना काय त्रास होतो, कुठल्या दिव्यातून जावं लागतं याची चर्चा करू या आणि त्यावर आनंददायी उत्तरं देण्याचा प्रयत्न करू या.

इंटेन्सिव्ह पालकत्व

अनेक पालक आपल्या मुलाच्या बालपणाचा प्रत्येक क्षण आपल्या मुठीत ठेवायला बघतात. बाळ जन्माला आल्यापासून त्या बाळात उद्याचा सचिन तेंडुलकर, उद्याची लता मंगेशकर, उद्याचा बिल गेट्‍स बघणारे हे पालक मुलांच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवत राहतात. त्यांच्या डोक्यावर भिरभिरत राहतात. यालाच ‘हेलिकॉप्टर पॅरेंटिंग’ म्हणतात. असे पालक पुढे जाऊन मुलांना समस्या निर्माण होण्याच्या आतच समस्येचं निराकरण करतात. याला ‘स्नो प्लॉ पॅरेंटिंग’ म्हणतात. (पाश्‍चात्त्य देशात प्लॉ वापरून रस्त्यावरचा बर्फ सारखा काढत राहतात, त्याच्या अनुषंगाने हा शब्द वापरला जातो.) यातून मुलांच्या कित्येक समस्या सुरू होतात.

मुलांच्या वेळेचं अतिनियोजन : असे पालक मुलांच्या दिवसातला एकही मिनिट मोकळा ठेवत नाहीत. अशा पालकांना वाटतं, की आपल्या पाल्याला मिळालेला रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय! त्यातूनच मग पाल्याला सकाळी शाळा, दुपारी ट्यूशन, मग कोडिंग, त्यानंतर स्पर्धात्मक खेळाचा क्लास, ते झालं की संगीताचा क्लास... हे सगळं करून आल्यावर जेवताना व्हिडिओज किंवा एखादा ऑनलाइन क्लास असं पाल्याला पार अडकवलं जातं. त्याला बिचाऱ्याला ‘आत्ता मला बॉल खेळायचाय’ हे सांगताही येत नाही. या सगळ्यामुळे मूल वैतागतं आणि त्याचं पालकांशी युद्ध सुरू होतं. मग पालक मुलांच्या वर्तनाच्या समस्या घेऊन आम्हा डॉक्टरांना भेटायला येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com