Premium|India Pakistan Cricket Relations : मोहसीन नक्वींमुळे भारत-पाक क्रिकेटमध्ये पुन्हा वाद; आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा चर्चेत

India Pakistan Cricket Relations : पाकिस्तान क्रिकेटमधील प्रशासकीय आणि कामगिरीच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांतील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे. मोहसीन नक्वी यांच्या भूमिकेमुळे आशियाई क्रिकेटमधील वादही वाढले आहेत.
UPI Digital Payments

UPI Digital Payments

esakal

Updated on: 

किशोर पेटकर

पाकिस्तानचे क्रिकेट अगदी रसातळाला गेले आहे हे हल्लीच इंग्लंडच्या दौऱ्यात दिसून आले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा प्रमुख या नात्याने आपल्या देशातील क्रिकेट सुधारण्याऐवजी नक्वी भारतीय क्रिकेटला चिडवण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. पाकिस्तान सरकारमधील प्रभावी मंत्री असल्यासारखे ते भासवतात.

भारताने खंडीय क्रिकेटमधील वर्चस्व अधोरेखित करताना वर्षभरात दोन वेळा आशियाई करंडक पटकावला. गतवर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने, तर यावर्षी हरमनप्रीत कौर कर्णधार असलेल्या महिला संघाने दबदबा राखत विजेतेपदावर मोहोर उमटवली. दुर्दैवाची बाब म्हणजे दोन्ही वेळेस दुबई येथे संघाला करंडकाविना जल्लोष करावा लागला, कारण आशियाई क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांनी सध्या भारतीय संघाला ‘जाणीवपूर्वक’ ग्रासले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गतवर्षी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून अमानुष हत्या केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. दोन्ही देशांदरम्यान अल्पकाळासाठी युद्धही (ऑपरेशन सिंदूर) झाले. या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबरचे क्रीडासंबंधही तोडले, अपवाद फक्त जागतिक आणि आशियाई स्पर्धांचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com