

World Athlete of the Year
esakal
मॅक्लॉफलिन हिने टोकियोतील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत नोंदविलेली ४७.७८ सेकंद वेळ जागतिक स्पर्धेतील ४२ वर्षांतील वेगवान ठरली. याच स्पर्धेत ती सुवर्णपदक जिंकलेल्या अमेरिकेच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाची सदस्य होती. गतवर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्येही तिने ४०० मीटर हर्ल्डल्समधील विश्वविक्रम (५०.३७ सेकंद) आपल्या नावे केला.
स्विडिश पोल व्हॉल्टर मोंडो डुप्लांटिस आणि अमेरिकन सिडनी मॅक्लॉफलिन-लेव्हरोन यांना २०२५मधील सर्वोत्तम जागतिक ॲथलीट किताब प्राप्त झाला. वर्षभरातील कामगिरी लक्षात घेता हे दोन्ही चँपियन ॲथलिट्स ‘वर्ल्ड ॲथलिट्स ऑफ द इयर’ किताबासाठी लायकच होते.