प्रसाद नामजोशी
मोनिका वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला, एकलमाता यांच्याविषयीच्या अनेक घटनांच्या बाजूनं ठामपणे मत व्यक्त करणारी अभिनेत्री आहे. मदतीच्या देखाव्याखाली केवळ नाचगाणी करून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याची जादू ती करून दाखवत नाही, तर स्वतःच्या खिशातून पैसे देण्यासाठीही तिनं मागे-पुढे पाहिलेलं नाही. इटलीच्या तरुणाईची ती आयकॉन आहे.
‘झीरो झीरो सेवन’ ही बॉन्डची खरी ओळख. उच्चारी ‘डबल ओ सेव्हन.’ त्यातले डबल ओ किंवा झीरो झीरो याचा अर्थ ‘लायसन्स टू किल’ असा होतो. म्हणजे ब्रिटिश इंटेलिजन्स सर्व्हिसेसने या सिक्रेट एजंटला एखाद्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार दिलेला आहे असा त्याचा थोडक्यात अर्थ.
खराच तसा दिलेला आहे, की ही सगळी इयान फ्लेमिंगची कल्पना आहे, हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. कारण एखाद्या सिक्रेट सर्व्हिसनं आपले हेर कसे सांभाळावे, त्यांचं कोडिंग कसं करावं आणि प्रत्यक्षात त्यांना कसं हाताळावं हा कोणालाही न कळलेला मामला आहे. आणि जेव्हा त्यातली एखादी गोष्ट बाहेर कळते असं आपल्याला वाटतं, त्याचाच अर्थ ती गोष्ट आजच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच बाद केलेली असणार हे ओळखण्यातच शहाणपणा आहे.