

Rainy Season Vegetable Cultivation
esakal
डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी
पावसाळ्याचा हंगाम भोपळा, काकडी यांसारख्या भाज्यांसाठी चांगला असला, तरी जास्त पाऊस झाल्यास यांची फुले खराब होतात. सततच्या पावसामुळे कीटक येऊ न शकल्यास परागीभवनात अडचणी येतात. इतर फळभाज्या आणि वनस्पतींवर आर्द्रतेमुळे बुरशीचा हल्ला होण्याची शक्यता असते.
गेल्या लेखामध्ये (कुंडी कशी भरायची, ता. ६ जून) आपण कुंडी भरण्याचे तंत्र पाहिले. आता आपली गच्चीवर बागकाम करायची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. खरेतर या कुंड्यांमध्ये आपण फुलझाडे, शोभिवंत झाडे, बोन्साय, सक्यूलंट्स, कॅक्टस, भाजीपाला असे बरेच प्रकार लावू शकतो. पण जर आपण फळभाज्या, पालेभाज्या, हर्ब्ज, फळझाडे इत्यादी लावले तर त्याच माती, पाणी आणि जागेचा अधिक उत्तम वापर होतो; बागकाम करण्याच्या आनंदाबरोबरच स्वतः पिकवलेल्या पोषक आणि रासायनिक फवारणीविरहित सकस भाज्या आपल्याला मिळतात. आता लवकरच येणाऱ्या पावसाळी हवामानात, कोणत्या भाज्या याची माहिती घेऊ या आणि करू या सुरुवात प्रत्यक्ष बागकामाला!