Mural painting
Esakal
सुमित खिरे
हल्ली घर सजवताना घराच्या भिंती स्वतःच रंगवण्याकडे अनेकांचा कल असतो. पण घरातल्या भिंतीवर म्युरल म्हणजेच भित्तिचित्र रंगवणं ही एक कला आहे. त्यासाठी संयम आणि योग्य तयारी करावी लागते. योग्य साधनांच्या निवडीसोबतच सरावही आवश्यक असतो. ही सर्जनशील प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी काही टिप्स...
पूर्वतयारी
निवड : शक्यतो गुळगुळीत आणि मजबूत भिंत निवडावी. ड्रायवॉल, प्लॅस्टर किंवा काँक्रिटची भिंत अधिक चांगली ठरते. खडबडीत किंवा असमान पृष्ठभाग टाळावा.