Musical Instruments
Esakal
श्रुती भागवत
संगीत निर्माण करण्यामध्ये वाद्यांची भूमिका किती महत्त्वपूर्ण ठरते! या वाद्यांचं जग अगदी भन्नाट आहे. तुम्ही कधी विचार केलाय का... विजेतूनही संगीत तयार होऊ शकतं? एखादं वाद्यं हत्तीपेक्षाही उंच असू शकतं? हात न लावताही वाद्यं वाजू शकतं? आणि काही वाद्यं तर चक्क आपण खाऊही शकतो... अशाच भन्नाट वाद्यांच्या भन्नाट गोष्टी!
कमाल पियानोची
जगातला सर्वात लांब पियानोचं नाव अलेक्झांडर! हा पियानो जवळपास १९ फूट लांब आणि सुमारे १२०० किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. या वाद्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एका १५ वर्षांच्या मुलानं तयार केला होता. पियानोतून अनेक वेगवेगळ्या वाद्यांसारखे सूर उमटू शकतात, त्यामुळे पियानोला ऑर्केस्ट्रा म्हटलं तर वावगं ठरणार नाही!