अश्विनी विद्या विनय भालेराव
कार्यशाळेतील अनुभव गाठीशी असल्यानं त्या अनुभवाचा आणि यूट्यूबचा आधार घेत मी गेली काही वर्षं गणपती साकारते आहे. यातली दोन-तीन वर्षं मी अष्टविनायकांपैकी दोन-तीन गणपती साकारले. एका वर्षी तर मी हट्टानं ‘लाल गणेश’ अर्थात तांबड्या मातीपासून गणपती साकारला.
काही वर्षांपासून मी शक्य तितके पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा निर्धार केला आणि त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक शाडू मातीचा बाप्पा! २०१७पासून मी गणेशोत्सवासाठी घरच्या घरी गणेश मूर्ती घडवत आले आहे.