Premium|Mystery Phone Call : रहस्यमय फोन कॉलने देसाई आजोबांची उडवली झोप

Desai Ajoba Story : एकाकी आयुष्यात शेजाऱ्यांच्या बातम्यांत रमणाऱ्या देसाई आजोबांना अचानक आलेल्या रहस्यमय फोनमुळे मोठी खळबळ उडते आणि त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येण्याची चाहूल लागते.
Desai Ajoba Story

Desai Ajoba Story

esakal

Updated on

रीटा खांडेकर

ती बातमी कोणी दिली असेल बरं? आजोबा आठवू लागले. खरंतर देसाई आजोबा आजकाल ‘देसाई’ कमी आणि ‘कसाई’च जास्त वाटत होते. त्यांनी खूप शत्रू जमवले होते. ‘आत्ता खाली जाऊन सोक्षमोक्ष लावून येतो’ या विचारापाठोपाठच दारातल्या ‘कुत्रराक्षसाचा’ चेहरा त्यांच्या मनःचक्षूंसमोर तरळला आणि ते तिथंच पुन्हा पंक्चर झाले. आख्ख्या आयुष्यात त्यांची कध्धी कध्धी अशी अवस्था झाली नव्हती!

देसाई आजोबांनी जोरात फोन आपटला. रागानं ते अगदी हिरवे-पिवळे पडले होते, टकलाला घाम आला होता. त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनं घाम पुसल्यावर त्यांना लक्षात आलं, की आपल्या टकलावर आधीपेक्षा जास्त केस आहेत! मग त्यांना समजलं, की तो त्यांची मांजर येऊन बसते तो टॉवेल होता. ‘‘ह्या! काहीही कुठंही फेकतात लेकाचे, एकालाही शिस्त नाही!’’ ते मोठ्यांदा खेकसले. सकाळपासून त्यांचं काहीच काम झालं नव्हतं, डोकं उठलं होतं फक्त.

एरवी एव्हाना त्यांची आन्हिकं उरकून बाजारात एक फेरी झालेली असायची. नाक्यावर उभं राहून बाजूच्या दळवींकडून सगळ्या शत्रूंचे समाचार मिळालेले असायचे. हा दळवी बाजूच्या सोसायटीचा सेक्रेटरी होता आणि एक महाभोचक माणूस होता. सगळीकडची माहिती ठेवायचा. त्याला नेमकी किल्ली कशी द्यायची हे देसाई आजोबांना माहीत होतं. अगदी हव्याहव्याशा चमचमीत बातम्या दळवी सहज द्यायचा. त्या बातम्या आजोबा अगदी वाकडं तोंड करून ऐकायचे. दळवी हा आजोबांचा करमणुकीचा स्रोत होता. पण हे ते त्या दळवीला कळू देत नसत. तेवढ्यासाठीच ते लगबगीनं आवरून बरोबर सकाळी नऊलाच बाहेर पडायचे. कारण त्याचवेळी तो दळव्या नातीला क्लासला सोडायला यायचा आणि अलगद आजोबांच्या हाती लागायचा. खरंतर या बातम्याच देसाई आजोबांसाठी करमणुकीचा स्रोत होत्या. असंही वयाच्या ८४व्या वर्षी बायको गेल्यावर, मुलं-नातवंडं सेटल झाल्यावर त्यांना जगण्यासाठी दुसरी प्रेरणा काय होती!

आज सकाळी चहा झाल्यावर देसाई आजोबा फिरून आले, दुसरा चहा घेतला आणि आता अंघोळीला जाणार इतक्यात त्यांचा फोन खणखणला. अनोळखी नंबर दिसला. कपाळावर आठ्या आणत त्यांनी तो उचलला. कोणीतरी दबक्या आणि धीरगंभीर आवाजात विचारलं, ‘‘देसाईंचा नंबर का?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com