Premium|Naneghat Inscription Satavahana Dynasty History : मराठी भाषेचे वय अडीच हजार वर्षे जुने! नाणेघाटातील सातवाहनकालीन शिलालेखातून मोठा पुरावा समोर

Archaeological Sites in Pune and Thane Border : जुन्नर जवळील ऐतिहासिक नाणेघाटातील सातवाहनकालीन शिलालेख आणि प्राचीन व्यापारी मार्गाच्या नोंदींवरून मराठी भाषेचे वय किमान अडीच हजार वर्षे जुने असल्याचे सिद्ध करणारे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत.
Naneghat Inscription Satavahana Dynasty History

Naneghat Inscription Satavahana Dynasty History

esakal

Updated on

डॉ. नागनाथ बळते

नाणेघाटातील शिलालेखाच्या नोंदींवरून असे सिद्ध होते, की महारठी भाषा बोलणारे ते महारठी लोक आणि ही भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश तो महारठी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश होय. ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे, ती त्याआधी किमान २०० ते ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. यावरून मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असले पाहिजे, असे अनुमान काढता येते.

नाणेघाटाचा शिलालेख सातवाहनकालीन इतिहासाचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. हा शिलालेख प्रामुख्याने राणी नागनिका हिने कोरवून घेतला असून त्यातून सातवाहन राजघराण्याची वंशावळ, धार्मिक परंपरा, यज्ञसंस्था आणि तत्कालीन सामाजिक-आर्थिक स्थितीची माहिती मिळते. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासासाठी हा शिलालेख उपयुक्त स्रोत आहे. महाराष्ट्रातील प्राचीन इतिहास, संस्कृती आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करताना नाणेघाट शिलालेखाला विशेष महत्त्व प्राप्त होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात असलेल्या नाणेघाट या डोंगरी घाटमार्गात हा शिलालेख आढळतो. प्राचीन काळी हा घाट व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. सातवाहन काळात या मार्गाद्वारे दख्खन आणि पश्चिम किनारपट्टी यांतील व्यापार चालत असे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com