
निखिल रोकडे
धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याने राज्यात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. गंगापूर हे स्वातंत्र्योत्तर नाशकातील पहिले धरण आणि मातीचा भराव टाकून बांधलेले महाराष्ट्रातील पहिले धरण. धरणांच्या बांधणीमध्ये गंगापूर धरणाने खऱ्या अर्थाने एक वेगळा प्रयोग करून दाखविला.