

Navratri Fasting and Healthy Garba Tips
esakal
डॉ. सुबोध देशमुख
नवरात्रात रात्री उशिरापर्यंत गरबा आणि दांडिया खेळल्यामुळे शरीरातून प्रचंड घाम गाळला जातो आणि कॅलरीज जळतात. गरबा खेळण्यापूर्वी एक तास आधी एखादे केळे किंवा मूठभर ड्रायफ्रूट्स खावेत. गरबा खेळताना सोबत पाण्याची किंवा लिंबूपाण्याची बाटली ठेवावी आणि थोडे थोडे पाणी पीत राहावे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
नवरात्र हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव नसून ऋतुबदलाच्या काळात शुद्धी करण्याचा एक उत्तम वैज्ञानिक मार्ग आहे. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असताना आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि पित्ताचा प्रकोप वाढतो. आजकाल उपवासाच्या नावाखाली साबुदाणा, बटाटे आणि साखरेचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे, यामुळे शरीराचे डिटॉक्स होण्याऐवजी वजन वाढणे, पित्त होणे आणि साखरेची पातळी बिघडणे अशा समस्या उद््भवतात. नवरात्रातील नऊ दिवसांचे उपवास आरोग्याला पूरक ठरवत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहू या.