

Newborn Baby Brain Development
esakal
आईने बालगीत न म्हणता, मोबाईलवरून गाणी ऐकली, बघितली तर? बाळाच्या मेंदूतले नेटवर्क त्या मोबाईलशी जोडले जाते. व्यक्तीशी नाही. कुठलाही स्क्रीन - टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल - एकतर्फी संवेदनांचा भडिमार करत असतो. त्यात परस्पर संवाद नसतो. संशोधनाने हे सिद्ध केले आहे, की एकच बालगीत आईने बाळाला हातात घेऊन, डोळ्यात डोळे घालून, हावभावासहित म्हटले, तर त्यातून मिळणारे उत्तेजन मोबाईलमधून व्हिडिओ पाहून-ऐकून मिळणाऱ्या उत्तेजनापेक्षा हजारोपटीने जास्त असतात.