Premium|Share Market: शेअर मार्केटमध्ये आता पुढे काय? ट्रम्प-मोदी गणित अजूनही सुलटलेले नाही..

Impact of GST cut on Nifty: ट्रम्प-मोदी संबंधांमुळे शेअर बाजारात अनिश्चितता कायम
Impact of GST cut on Nifty

Impact of GST cut on Nifty

Esakal

Updated on

अर्थविशेष । भूषण महाजन

जीएसटी कपातीनंतर लगेच पुढे येणाऱ्या आठव्या वेतन आयोगाची चाहूल लागेल. पुढील तीन महिन्यांत निफ्टी नवा उच्चांक करण्याचे सारे संकेत दिसत आहेत. मागील लेखात निर्देशित केलेली सर्व क्षेत्रे तेजीत आली आहेत. त्यात सरकारी बँका, धातू क्षेत्र, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र प्रामुख्याने दिसते.

वाचकहो, आमचा या पूर्वीचा लेख (एक झुंज वाऱ्याशी, ता. ४ ऑक्टोबर) तुमच्या हाती पडला, त्यावेळी निफ्टी होती २४६५० आणि पुढील वाटचालीबद्दल धाकधूक होती. पुढे काय होणार? ट्रम्प ह्यांचे आव्हान आपण कसे झेलणार? टॅरिफ कमी होणार की नाही? देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार का? आणि त्यात यश मिळणार का? सरकार देशांतर्गत काय पावले उचलणार? वगैरे वगैरे. बऱ्याच देशांतर्गत मागण्या-प्रोत्साहनाच्या चिंता दूर करत, जीएसटी कपातीच्या साहाय्याने निफ्टीने ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहाअखेर २५७२२पर्यंत झेप घेतली. त्यापूर्वी २६१०० अंशाला स्पर्श करून मगच थोडी खाली आली. वाऱ्याशी घेतलेली झुंज यशस्वी ठरली. ऑक्टोबर महिन्यात १५०० अंश वाढल्यानंतर निर्देशांक थोडे शांत होणारच!

आता पुढे काय? ट्रम्प-मोदी गणित अजूनही सुलटलेले नाही. ट्रम्प ह्यांच्या अतिआत्मविश्वासाला मोदींनी मौनानेच उत्तर दिले आहे; दोघांनीही प्रत्यक्ष भेट टाळली आहे. दरम्यान बहुचर्चित ट्रम्प-शी जिनपिंग बैठक झाली. कोणाच्या पदरात काय पडले ह्याचा हिशोब विश्लेषक लावतीलच, पण ट्रम्प ह्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात चीन यशस्वी झाला आहे असे दिसते. चीनचे आयातशुल्क दहा टक्क्यांनी कमी झाले आहे आणि दुर्मीळ खनिजांच्या पुरवठ्याबद्दल वाटाघाटी सुरूच राहतील असे ठरले आहे. थोडक्यात असे, की खडाखडी झाली, निष्कर्ष फार उत्साहवर्धक नाहीत. ताज्या बातमीनुसार, व्हाइट हाऊसने जाहीर केले की चीनशी समझोता झाला आणि ‘रेअर अर्थ’ खनिजांची निर्यातबंदी चीनने (तूर्त एका वर्षासाठी) मागे घेतली आहे, तसेच सोयाबीन आयात करण्याचे कबूल केले आहे. नाक दाबल्यावरच अमेरिकेचे तोंड उघडते हा त्यातून मिळालेला धडा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com