वयाच्या पन्नाशीत चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कश्या घालवाल? हे करा उपाय

चेहरा व हातांचा रफनेस आणि ड्रायनेस घालवण्यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक
Skin care
Skin careEsakal

सेक्शन : बोल्ड अॅण्ड ब्यूटिफुल

स्वप्ना साने

चेहरा व हातांचा रफनेस आणि ड्रायनेस घालवण्यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. घरच्या घरीही करता येण्यासारखे काही उपाय असतात.

स्किन टाइटनिंगसाठी काही घरगुती उपाय करता येतील का? माझे वय सत्तेचाळीस आहे. कपाळावर, डोळ्याभोवती आणि मानेवर सुरकुत्या जाणवत आहेत. शिवाय हातही ड्राय आणि रफ झालेत. पार्लरला सारखे जाणे जमणार नाही, कारण दिवसभर ऑफिसचे काम असते आणि सुट्टीच्या दिवशी घरातील कामे असतात. त्यामुळे घरच्या घरी काही करता येईल का?

: हल्लीच्या काळात कमी वयातच फाइन लाइन दिसून येतात. एकतर, जीवनशैलीमध्ये बराच बदल घडलेला आहे; वेगवान आयुष्य आणि त्यामुळे स्वतःकडे होणारे दुर्लक्ष ह्यामुळे स्वतःची काळजी घेतली जात नाही.

त्यात भरीस भर म्हणून आपण सगळेच भरपूर प्रदूषण आणि केमिकलना एक्स्पोज होत असतो. या सगळ्याचा परिणाम त्वचेवर होतो, आणि कालांतराने त्वचेबाबतच्या अडचणी सुरू होतात. सर्वप्रथम, चेहऱ्याला साबण लावणे बंद करावे.

साबणामुळे त्वचा जास्त कोरडी होते. चांगल्या क्वालिटीचा फेस वॉश वापरावा. शक्यतोक्रीम बेस्ड फेस वॉश वापरावा. सगळ्यात उत्तम म्हणजे ऑइल क्लीन्सग करावे. चेहऱ्याला खोबऱ्याचे तेल लावून ओल्या कापसाने पुसून काढावे.

असे केल्यास त्वचा क्लीन तर होईल, शिवाय कोरडीही होणार नाही. स्किन टाइटनिंगसाठी घरगुती उपाय करता येईल. एका अंड्याचा पांढरा भाग घ्या. त्यात अर्धा चमचा मिल्क पावडर आणि थोडा मध मिक्स करून

केलेला पॅक पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावा. जसजसा पॅक ड्राय होईल, तसे त्वचेला टाइटनिंग जाणवेल, त्वचा टोन होईल, टवटवीत आणि फ्श रे दिसेल. पॅक धुतल्यावर लगेच फेस सीरम लावून घ्यावे.

हाच पॅक मानेलादेखील लावता येईल. आठवड्यातून दोन वेळेस हा पॅक लावावा, फायदा होईल. ह्याशिवाय रोज रात्री झोपताना बदाम तेल घेऊन त्याने गळा, मान आणि चेहऱ्याला हलका मसाज करावा.

महिन्यातून एकदा पार्लरला जाऊन  हायड्रेटिंग आणि नरीशिंग फेशियल करावे. ड्राय आणि रफ हातांना खूप जास्त केअरची गरज असते.

चांगल्या क्वालिटीचे हँड क्रीम घ्यावे. हात धुण्यासाठी उटणे वापरावे. म्हणजे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचाही कोरडी पडणार नाही.

जसा एग पॅक चेहऱ्यासाठी सांगितला, तोच पॅक हातांनाही लावता येईल. महिन्यातून एकदा पार्लरला जाऊन वॅक्स पॅक थेरपी घ्यावी. वॅक्स पॅक मॉइस्चरायझिंग असतो, त्यामुळे हात एकदम सॉफ्ट होतात.

होम केअरमध्ये रात्री झोपताना हातांना पेटरोलि् यम जेलीने मसाज करावा आणि ते तसेच ठेवावे. दिवसा जेवढ्या वेळेस हात धुतले जातील, तेवढ्या वेळा हँड क्रीम लावावे. हे असे नियमित केल्याने त्वचेमध्ये बराच फरक जाणवेल.

Skin care
Science Day : इम्युनोथेरपीने रक्ताचा कर्करोग असलेली एक व्यक्ती नुकतीच पूर्णतः बरी झाली; काय आहे पुनर्संयोजित प्रथिने?

रफनेस कमी होईल आणि फाइन लाइनही कमी होतील. एकदा सुरकुत्या आल्यावर, त्या घालवता येत नाही. त्या तात्पुरत्या कमी करता येऊ शकतात. पण अजून जास्त येऊ नयेत ह्याकरिता नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.

निवेदन

थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.

-------------

Skin care
हो, चक्क १२,००० चवींचा चहा..! २०५१ कोटींच्या उद्योगात रूपांतर झालेले स्टार्टअप; ‘चायोस’ची स्फूर्तिदायी कहाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com