Premium|NSE IPO : २०२५ च्या आयपीओ बाजारानंतर एनएसईचा मेगा इश्यू किती फायदेशीर ठरणार?

2025 IPO Performance and NSE Mega Issue : २०२५ मधील आयपीओ बाजारात काही कंपन्यांनी चांगली कामगिरी केली, तर काहींना धक्का बसला. आता एनएसईच्या बहुप्रतीक्षित मेगा इश्यूकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
2025 IPO Performance and NSE Mega Issue

2025 IPO Performance and NSE Mega Issue

eSakal

Updated on

सन २०२५मधील आयपीओ थंड-गरम राहिले. मिशो, ग्रो, बेलराइजने चांगली कामगिरी केली, तर अनेक भरवशाच्या म्हशींना टोणगेच झाले. मग टाटा कॅपिटल असो की एचडीबी फायनान्स! आता एनएसईचा गेली पाच वर्षे गाजत असलेला मेगा इशू येत आहे. त्यात भांडवल विक्रीपूर्वीच मोठी हवा झाली आहे. प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या पदरात काय पडते ते बघायचे.

मागील दोन सप्ताहांत शेअर बाजारात चाललेली घालमेल आपण बघितली. आमच्या म्हणण्याप्रमाणे तेजीचे सारे रसायन तयार होते, पण तसे झाले नाही. कारण ट्रम्प आणि इराण यांचे परस्परांवरील हल्ले थांबले नाहीत, होर्मुझ सामुद्रधुनीमधून वाहतूक सुरळीत सुरू झाली नाही, त्यात येमेनमधील हुती बंडखोरांच्या हल्ल्याच्या भीतीने सौदी अरेबियाने लाल समुद्रातून होत असलेली खनिज तेलाची वाहतूक बंद केली. परिणामतः खनिज तेलाने धोक्याची पातळी पार केली. ता. १३ सप्टेंबरपर्यंत तेलाने १०० डॉलरची पातळी ओलांडली आहे. आपल्यावर ट्रम्प यांची खास ‘कृपा’ असल्यामुळे रशियाकडून आपण मुक्तपणे खनिज तेलाची खरेदी करू शकत नाही, पण युरोपीय राष्ट्रे करू शकतात. थोडक्यात काय तर, आपली ग्रहदशा अजूनही सुधारलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com