

Velas bird watching experience
esakal
रात्री गप्पा मारताना सहज कुतूहल म्हणून ती पिसं कोणाची आहेत ते गुगल सर्च केलं आणि मी थक्क झाले! माझ्या हातातली ती गव्हाणी घुबडाची मुलायम पिसं बघताना, ‘निसर्ग जे दाखवतो ते बघ. त्याचे संकेत समजून घे’ हे सरांचे शब्द आठवले. खरं नाही, तरी अशा प्रकारे घुबड माझ्या हाती लागलंच होतं! वाटलं, ‘पुढच्यावेळी येशील तेव्हा खरंही दिसेल’ असाच तर संकेत त्या पिसातून तो निसर्ग मला देत नसेल? नुसत्या विचारानंच मन पिसं होऊन गेलं!