Premium|Ocean mysteries explained : महासागराच्या अथांग पोटात दडलेली विज्ञानाला चकित करणारी रहस्ये

Marine Mineral Resources : महासागरांच्या अथांग पोटात दडलेली खनिजसंपत्ती, मिठाचे अफाट साठे आणि विज्ञानालाही चकित करणारी रहस्ये मानवाच्या ज्ञानाला सतत नवे आव्हान देत आहेत.
Ocean mysteries explained

Ocean mysteries explained

esakal

Updated on

श्रेया माधवी

प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर माणसानं अंतराळात झेप घेतली, पण महासागर अजूनही काहीसा अनएक्सप्लोअर्डच आहे. या निळ्याशार पाण्याखाली दडलेल्या गमती विज्ञानालाही चकित करणाऱ्या आहेत. महासागर माणसाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देतो. आपण या महासागरांना जपलं, तर महासागरही आपल्याला जपतील!

आपल्या ग्रहाचा जवळजवळ ७० टक्के भाग पाण्यानं व्यापला आहे. हे पाणी म्हणजेच पृथ्वीभर विस्तीर्ण पसरलेले महासागर. माणूस पार चंद्रावर पोहोचला, पण महासागराच्या खोल खोल तळाशी त्याला अजून पोहोचायचंय! पृथ्वीवर पाच महासागर असले, तरी सगळे महासागर एकमेकांना जोडलेले आहेत. माणसाला त्याच्याच ग्रहावरचा महासागराचा भाग अजूनही बऱ्याच प्रमाणात अज्ञात आहे. हेच अज्ञान माणसात कुतूहल निर्माण करतं. महासागरासमोर माणूस जेवढा छोटा वाटतो, तेवढीच त्याची उत्सुकता विशाल असते. महासागरांच्या पोटात विज्ञानालाही थक्क करणारी कितीतरी आश्‍चर्य दडलेली आहेत... त्यांच्याविषयी...

१. खनिजांचा खजिना

तंत्रज्ञान, संरक्षण यंत्रणा आणि पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी काही खनिजं अत्यंत महत्त्वाची ठरतात. साधारण १३ खनिजं पृथ्वीच्या गर्भात आढळतात. पण ३७ खनिजं मुख्यतः महासागराच्या पोटात आढळतात. विविध यंत्रं, वस्तू, वाहनांसाठी लागणारा कच्‍चा माल महासागरांत दडलेला आहे. म्हणून प्रगत तंत्रज्ञानामुळे जगाची नजर जमिनीतल्या खाणींवरून हटून अथांग महासागरांच्या पोटाकडे वळू लागली आहे. हा खनिजांचा खजिना शोधताना माणसानं महासागरांची काळजीही घ्यायला पाहिजे हेही तितकंच खरं.

२. केवढा तो मिठाचा साठा!

सगळ्या महासागरांतलं संपूर्ण मीठ काढून ते पृथ्वीच्या भूभागावर एकसारखं पसरवलं, तर त्याचा जवळजवळ ५०० फुटांपेक्षा (१६६ मीटर) जास्त जाडीचा थर तयार होईल. म्हणजेच साधारणपणे एका ४० मजली इमारतीच्या उंचीएवढा तो थर असेल! गंमत म्हणजे, महासागराच्या पाण्यात साधारणपणे ३.५ टक्के वजन हे विरघळलेल्या मिठाचं असतं. महासागर फक्त पाण्याचाच नाही, तर मिठाचाही ‘महासागर’च असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com