Premium|Kolhapur Tourism : अंबाबाई-पन्हाळगडापलीकडचं कोल्हापूर; निसर्ग आणि इतिहासाच्या आडवाटांची सफर

Hidden Places in Kolhapur : अंबाबाई, पन्हाळगड आणि कोल्हापुरी चप्पलीपलीकडेही कोल्हापूरमध्ये हिरवे डोंगर, जंगलवाटा, नद्या, मंदिरे, गडकोट आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारी अनेक आडवाटांची ठिकाणे आहेत.
Hidden Places in Kolhapur

Hidden Places in Kolhapur

sakal

Updated on

शिवाजी यादव

कोल्हापूर म्हटले, की डोळ्यांसमोर येते ते अंबाबाईचे जागृत देवस्थान, पन्हाळगड, तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल आणि कुस्तीचा आखाडा... पण या ओळखीच्या पर्यटनस्थळांच्या पलीकडेही कोल्हापूरचा एक वेगळाच चेहरा आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेले, इतिहासाच्या खुणा जपणारे आणि गावाकडच्या साधेपणाचा अनुभव देणारे ‘आडवाटेचे कोल्हापूर’...

हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या, पावसाने नटलेली हिरवाई, दूरवर पसरलेले पाणलोट तसेच वन्यजीवांनी समृद्ध अशी विपुल वनसंपदा! हिरवीगार शेतशिवारे, ग्रामीण संस्कृतीची शान असलेली कौलारू घरे, चमचमीत पण तितकेच खमंग मसाल्याचे पदार्थ, शाकाहारी-मांसाहारी जेवण, फुललेल्या बागा, नद्यांचे उगम आणि संगम, सुंदर मंदिरे, भक्कम गडकोट, ५० ते ७० किलोमीटर अंतरातील जंगली पायवाटांवरची पदभ्रमंती, एकाच वेळी नजरेच्या टापूत दिसणारा कोकण अशी प्रत्येक कानाकोपऱ्यात काहीतरी नेत्रसुखद दृश्ये हमखास पाहायला मिळतील, याची शाश्‍वती देणारा, ‘बजेट’मध्ये बसणारा आणि भरगच्च पर्यटनाचा आनंद देणारा ‘लय भारी’ जिल्‍हा म्हणजे कोल्हापूर!

कोल्हापूर ऐतिहासिक, धार्मिक नगरी असली तरी नव्या काळातील चौफेर विकास आणि तारांकित सुविधांनी शहराला आधुनिकतेचा लुक आला आहे. पश्‍चिम घाटातली सह्याद्रीची रांग या जिल्ह्याची संरक्षण भिंत म्हणून उभी आहे. जिल्ह्यात चहूबाजूंना असलेली प्रेक्षणीय स्थळे आणि धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकांना सदैव आकर्षित करतात. इतकेच नव्हे तर चार दिवस कोल्हापुरात घालवले, की माणूस इथल्या भौगोलिक वातावरणासह कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीशी एकरूप होऊन जातो.

अलीकडच्या काळात येथील दळणवळणाच्या सुविधाही गरजेइतक्या सक्षम झाल्या आहेत, त्यामुळे देशभरातील पर्यटक कोल्हापुरी पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच धार्मिक तीर्थाटनातून मनःशांती मिळविण्यासाठी कोल्हापूरला येतात. म्हणूनच येथील शहरातील मुख्य रस्ते पर्यटकांच्या गर्दीमुळे कायम प्रवाही राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com