Premium|Osteoporosis Prevention : ऑस्टिओपोरोसिसचा वाढता धोका; चाळिशीनंतर हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय कराल?

Bone Health After 40 : ऑस्टिओपोरोसिस हा हाडे हळूहळू कमकुवत करणारा ‘सायलेन्ट थीफ’ आहे; योग्य व्यायाम, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि वेळेवर तपासणीमुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
Premium|Osteoporosis Prevention : ऑस्टिओपोरोसिसचा वाढता धोका; चाळिशीनंतर हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय कराल?
Updated on

डॉ. सुबोध देशमुख

हलके वजन उचलल्यास किंवा रेझिस्टन्स बँडचा वापर करून व्यायाम केल्यास हाडांवर एक सकारात्मक ताण पडतो, त्यामुळे रक्तातील कॅल्शियम शोषले जाऊन हाडे मजबूत होतात. यासोबतच योगासने आणि प्राणायामामुळे शरीराचा समतोल आणि स्नायूंची ताकद सुधारते.

आपले शरीर हाडांच्या भक्कम सांगाड्यावर उभे असते. वयाच्या एका ठरावीक टप्प्यापर्यंत हाडांची घनता आणि बळकटी उत्तम असते. मात्र वय वाढू लागते, तशी हाडे आतून पोकळ आणि ठिसूळ होऊ लागतात. या वैद्यकीय स्थितीला ‘ऑस्टिओपोरोसिस’ असे म्हणतात. हा आजार अत्यंत संथ गतीने आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता शरीरात वाढत असल्यामुळे याला हाडांचा ‘सायलेन्ट थीफ’ म्हणजेच सुप्त चोर म्हटले जाते. अनेकदा एखादा किरकोळ धक्का लागल्याने किंवा घसरून पडल्याने थेट फ्रॅक्चर होते आणि तेव्हाच या आजाराचे निदान होते. विशेषतः चाळिशी ओलांडलेल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही या आजाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने याविषयी शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com