Premium|Smart Car: आता कारदेखील होणार स्मार्टफोनप्रमाणे अपडेट.!

OTA updates: ओटीए अपडेट्समुळे कार्स बनणार 'सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेइकल्स', वाहन उद्योगात क्रांती
Smart Car
Smart CarEsakal
Updated on

सागर गिरमे

A new software update is available. This update is scheduled for midnight. (अ न्यू सॉफ्टवेअर अपडेट इज अॅव्हेलेबल. धिस अपडेट इज शेड्युल्ड फॉर मिडनाइट.) एखाद्या दिवशी अचानक तुम्हाला असा मेसेज आला तर थोडं थांबा, विचार करा. कारण, हा मेसेज तुमच्या स्मार्टफोनच्या अपडेटसाठी नसून, तुम्ही वापरत असलेल्या कारच्या सॉफ्टवेअर अपडेटसाठी असणार आहे... होय तुम्ही बरोबर वाचलंत! आता कार्सही स्मार्टफोनसारख्या अपडेट होतायेत.

सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात कार्स फक्त प्रवासापुरत्याच मर्यादित न राहता त्या अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीयुक्त अशा गॅजेट्स बनू पाहताहेत. याच टेक्नॉलॉजीच्या जोरावर स्मार्टफोनप्रमाणेच आता कार्समध्येही सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर अपडेट्स वायरलेस पद्धतीने केले जात आहेत. हेच अपडेट ओटीए अर्थात ‘ओव्हर दि एअर’ या नावाने ओळखले जात आहेत. या टेक्नॉलॉजीमुळे कार्सच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणे, नवीन फीचर्स जोडणे आणि सुरक्षितता वाढवणे शक्य झाले आहे.

ओटीए अपडेट्स म्हणजे काय?

ओटीए अपडेट्स म्हणजे वायरलेस पद्धतीने कारच्या सॉफ्टवेअर किंवा फर्मवेअरमध्ये सुधारणा करणे. अगदी गेल्या वर्षीपर्यंत कारच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यासाठी सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागायची. या गोष्टी कदाचित आपल्या लक्षात येत नसतील, पण आपण वापरत असलेल्या कारमध्ये डेटा एकत्र करणारे ऑन बोर्ड डायग्नोस्टिक किट (ओबीडी) लावलेले असते.

त्या किटमध्ये सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिक केबलद्वारे अपडेट्स इन्स्टॉल करतात. अर्थात हे आपल्याला माहीत असेलच असे नाही, कारण कार रुटीन सर्व्हिसिंगसाठी गेल्यावर या गोष्टी तिथे केल्या जातात. पण आता स्मार्टफोनप्रमाणेच कार्समध्येही इंटरनेटद्वारे (वाय-फाय किंवा सेल्युलर नेटवर्कद्वारे) अपडेट्स थेट डाउनलोड होऊन आपोआप इन्स्टॉल केले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com