

Saree Selection Tips
esakal
कपाटात कितीही साड्या असल्या तरी ऐनवेळी कुठली साडी नेसायची हा प्रश्न पडतोच. प्रसंग बघून कुठली साडी नेसायची हे गणितापेक्षाही अवघड असतं. माझ्यासारख्याच अनेकींना हे गणित सोडवण्यासाठी थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न...
साडी हा स्त्रियांसाठी एक अविभाज्य भाग आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा असं हे वस्त्र आहे. साड्यांमध्ये विविधताही खूप आहे. विविध प्रकारच्या कपड्यांपासून असंख्य डिझाईन्समध्ये साड्या उपलब्ध असतात. त्यामुळे काहीवेळा असंही होतं, की कुठल्या प्रसंगाला कुठली साडी नेसायची ते सुचत नाही! योग्य प्रसंगानुसार योग्य साडी निवडली, तर आपलं व्यक्तिमत्त्व अजूनच खुलून दिसतं आणि आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं, कॉन्फिडन्स येतो. प्रसंगानुसार कोणती साडी नेसायची हे ठरवण्यासाठी काही टिप्स...