Premium|Paithani Saree Tradition : मोर, कमळ आणि सुवर्ण जरीकाम; पैठणीच्या नक्षीत जिवंत आहे महाराष्ट्राची परंपरा

Paithani Saree and Maharashtra’s Textile Heritage : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेली पैठणी ही केवळ साडी नसून, रेशीम, सुवर्ण धागे, निसर्गप्रेरित नक्षीकाम आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या कारागिरीतून साकारलेली जिवंत कलापरंपरा आहे.
Paithani Saree and Maharashtra’s Textile Heritage

Paithani Saree and Maharashtra’s Textile Heritage

esakal

Updated on: 

वर्षा गजेंद्रगडकर

प्रत्येक पैठणी वेगळी असते. पहिली दुसरीसारखी नसते. प्रत्येक नमुना वेगळा, त्याचं सौंदर्य वेगळं. विणीतले किरकोळ बदल, जरीच्या धाग्यांची घनता आणि बुट्टीची रचना यांमुळे प्रत्येक पैठणी ती तयार करणाऱ्या कारागिराच्या हातांचा वेगळा ठसा घेऊन येते. पैठणी एखाद्या संचितासारखी आजीकडून आईकडे, आईकडून लेकीकडे जाते.

भारताच्या समृद्ध संस्कृतीचं ठळक प्रतिनिधित्व करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहता येतं. विविध लोकपरंपरा, लोकजीवन, कला, भाषा, साहित्य आणि श्रद्धा-समजुती यांच्या सुंदर संगमातून महाराष्ट्राची संस्कृती घडत आली आहे. सातवाहनांपासून वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, आधुनिक इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या साम्राज्यांनी कला, साहित्य, उत्सव यांना पाठबळ देत महाराष्ट्राच्या संस्कृतीला वर्धिष्णू केलं. महाराष्ट्रातला प्रत्येक प्रांत आपापल्या कलावैशिष्ट्यासाठी नावाजलेला आहे. शिल्पकला, धातुकाम, बांबूकौशल्य, तसंच घोंगडी आणि पैठणीपर्यंतचा मोठा पैस व्यापणारी इथली वस्त्रकला अशा विविध हस्तकला महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आजही वाढवत आहेत.

महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभवाला रंग, रेशीम आणि सुवर्ण धाग्यांची किनार लाभते, तेव्हा ते वैभव पैठणीतून प्रतीत होताना दिसतं. पैठणी म्हणजे केवळ एक साडी नाही; ती महाराष्ट्राच्या कलापरंपरेनं विणलेली एक जिवंत कथा आहे. तिच्या तलम रेशमी पोतावर खुलणारे मोर, कमळं, वेलबुट्टी आणि जरतारी पदर म्हणजे जणू कुशल हातांनी विणलेली स्वप्नं असतात. निसर्गातून प्रेरणा घेऊन पैठणीवरच्या काही प्रतिमा जशा तयार झाल्या आहेत, तसंच पुराणातल्या कथा, राजघराण्यातल्या कलापरंपरा यांतूनही नक्षीकामासाठी कारागिरांना कल्पना सुचत आल्या आहेत. पैठणीच्या प्रत्येक धाग्यात कारागिराच्या सर्जनशील बोटांचं कौशल्य, पिढ्यान्‌पिढ्या जपलेली परंपरा आणि रंगांविषयीची विलक्षण जाण सामावलेली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com