

Fashion And Self Confidence
esakal
वैष्णवी पटवर्धन
माझ्या डोक्यात नेहमी नुकतंच ऐकलेलं एखादं गाणं सुरू असतं. एखादा ड्रेस घातल्यावर खूश होऊन मी ते गाणं गुणगुणायला लागल्यावर मला आपोआप लक्षात येतं, की आपल्या मनासारखा लुक झालाय. टिपिकल बॉलिवूड फील येतो! मी त्याला ‘मन का रेडिओ’ म्हणते, तो वाजू लागला की मी खूश! मला असं वाटतं, तुम्हीही तुमच्या ‘मन का रेडिओ’चं ऐका, तो तुमच्याशी सगळ्यात जास्त खरं बोलत असतो.