Premium|Photography: प्रत्येक फोटो एक फ्रेम नव्हे, तर एक भावना; माझ्यासाठी फोटोग्राफी म्हणजे...

Self-discovery: जे क्षण अचानकपणे दिसतात आणि मनाला स्पर्श करतात अशा क्षणांचा मी पाठलाग करत राहिले आहे, गर्दीच्या बाजारांपासून ते शांत कोपऱ्यांपर्यंत...
photography
photographyEsakal
Updated on

स्वप्ना पाटसकर

फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी आणि फिल्म मेकिंग माझ्यासाठी फक्त काम किंवा व्यवसाय नाही, ती एक दृष्टी आहे. जगाला समजून घेण्याचा, त्याच्याशी जोडण्याचा आणि परत स्वतःकडे येण्याचा एक मार्ग आहे.

मी  जेव्हा फोटोग्राफीला सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे मोठा कॅमेरा किंवा काही योजना नव्हती. माझा पहिला कॅमेरा साधा होता, क्लिक ३. त्यानंतर पिंटू दादांनी शिकण्यासाठी तात्पुरता दिलेला पेटॅक्स के १०००. पण जेव्हा मी त्या कॅमेऱ्यातून जग पाहिलं, तेव्हा काहीतरी बदललं. प्रकाश मला काहीतरी सांगतोय असं वाटू लागलं! आजूबाजूच्या सगळ्या गोंधळातही नेमक्या फ्रेम्स दिसू लागल्या. सामान्य क्षणही सुंदर भासू लागले. जगभरात सौंदर्य आणि आश्चर्य भरलेलं आहे, फक्त ते ओळखण्याची आणि टिपायची गरज असते.

जे क्षण अचानकपणे दिसतात आणि मनाला स्पर्श करतात अशा क्षणांचा मी पाठलाग करत राहिले आहे, गर्दीच्या बाजारांपासून ते शांत कोपऱ्यांपर्यंत. फोटोग्राफीमुळे मला मोकळं वाटतं. मी लोकांमध्ये फिरू शकते, गृहीतकं न ठेवता पाहू शकते आणि वास्तव टिपू शकते. कधी ते क्षण गमतीशीर असतात, कधी अनपेक्षित; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खरे असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com