Premium|Vegetarian protein diet : शाकाहारी आहारातून प्रोटीन मिळवणे आता सोपे; स्नायूंच्या बळकटीसाठी करा 'या' पदार्थांचा समावेश

Muscle Recovery Nutrition : शाकाहारी आहारातून प्रथिने मिळवणे कठीण असल्याचा गैरसमज दूर करून, भारतीय पारंपरिक पदार्थांच्या अचूक नियोजनातून स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचे महत्त्व तसेच विविध नैसर्गिक स्रोतांची माहिती या लेखात दिली आहे.
Healthy Indian vegetarian meal with sprouts, paneer, and lentils platter

Healthy Indian vegetarian meal with sprouts, paneer, and lentils platter

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

शाकाहारी आहारातून प्रथिने मिळवणे कठीण आहे, हा केवळ एक गैरसमज आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास आपण आपल्या रोजच्या जेवणातून शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो. प्रत्येक जेवणात प्रथिनांचा किमान एक स्रोत असणे आवश्यक आहे. केवळ एकाच अन्नावर अवलंबून न राहता आहारामध्ये विविधता ठेवावी. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम केल्यास हे अन्न शरीराला अधिक चांगले लागते. आपल्या पारंपरिक भारतीय अन्नामध्ये प्रथिनांचे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त जागरूक राहून त्यांचा योग्य वापर करण्याची!

भारतीय आहार पद्धतीमध्ये प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांचा भरणा जास्त असतो, पण शरीराच्या बांधणीसाठी प्रोटीन म्हणजेच प्रथिनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे स्रोत मर्यादित आहेत, असा एक समज समाजामध्ये पसरलेला आहे. मात्र योग्य माहिती आणि नियोजनाद्वारे आपण शाकाहारी अन्नातूनही मुबलक प्रमाणात प्रथिने मिळवू शकतो. स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिनांची गरज भासते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी प्रथिनांचे प्रमाण हे त्याच्या वजनावर आणि कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रथिनांचा समावेश केल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com