Premium|Political Differences : राजकीय मतभेदांमुळे मैत्री आणि नाती दुरावू नयेत; संवादाचे पूल बांधण्याची गरज

Political Differences and Relationships : राजकीय विचारांमधील मतभेदांमुळे मैत्री, कौटुंबिक नाती आणि विवाहसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. कट्टरता कमी करण्यासाठी संवाद आणि परस्परांचा आदर महत्त्वाचा आहे.
Political Differences and Relationships

Political Differences and Relationships

esakal

Updated on: 

तन्मय कानिटकर

आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचे लोक वाईटच आहेत आणि ते जगाचं वाईटच करू बघतात या भयगंडापासून दूर राहणं श्रेयस्कर. आपल्या वर्तुळातल्या माणसांना दूर ढकलणारे किंवा नात्यांत कटुता येईल असं आपलं वर्तन आपल्याही नकळत आपल्याकडून होत नाही ना, ही काळजी घ्यायला हवी. वर्षानुवर्षाची मैत्री, कौटुंबिक नातेसंबंध या भेदांच्या पलीकडे जायला हवेत. संवादाचे पूल समोरच्याची (आणि आपलीही) कट्टरता कमी करण्यात मदत करतात.

शाळेतल्या मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप. आता सगळे चाळिशीजवळ पोहोचलेले, पण एकमेकांना हाफचड्डी घालण्याच्या वयापासून ओळखणारे. एकमेकांची टिंगलटवाळी करणारे, कधीही हक्काने मदतीसाठी साद घालू शकतील असे. तेवढ्यात एक दिवस कोणीतरी कुठूनतरी आलेला फॉरवर्ड मेसेज ग्रुपवर ढकलून देतो. त्या मेसेजमध्ये बेमालूमपणे भावनांना हात घातलेला असतो. कोणत्यातरी राजकीय पक्षाला वा विचारधारेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं असतं, विरुद्ध बाजूच्या पक्ष वा विचारधारेचं अप्रत्यक्ष समर्थन असतं. मग कोणीतरी मित्र त्या मेसेजचा प्रतिवाद करायला सरसावतं. बघता बघता दोन गट पडतात. एखादा कोणी असतो, जो दोन्ही बाजूंना सबुरीचा सल्ला देऊ बघतो; पण त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं. हळूहळू हा वाद विचारधारा वा पक्ष याकडून वैयक्तिक टीका-टिपण्णीकडे वळतो. एकमेकांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातात, एकमेकांच्या देशप्रेमाविषयी शंका व्यक्त होतात. दोन्ही बाजूंमधले कोणीतरी एक-दोघं चांगलेच आक्रमक असतात. त्यातला कोणी एक अद्वातद्वा बोलतो. दुसऱ्या बाजूचा चिडून, दुखावला जाऊन ग्रुपमधून बाहेर पडतो. एकुणातच गटात भयानक नकारात्मकता पसरते. शाळेतले जुने फोटो शेअर करून त्यावर मस्करी करणारे, आठवणींना उजाळा देणारे मित्र एकमेकांचं तोंडही बघायला नको, या पातळीवर जातात. पुढे मग ‘या ग्रुपवर राजकीय चर्चा नकोत’ असा फतवा निघतो, पण ग्रुप पूर्ववत होत नाही. तिथली खुली थट्टामस्करी आता राजकीय चष्म्यातून जोखली जाईल म्हटल्यावर खुलेपणाच हरवून जातो...  

ओळखीचा वाटला हा प्रसंग? तुम्ही स्वतःसुद्धा कधीतरी अशा प्रसंगाचा भाग झाला असाल किंवा किमान साक्षीदार राहिला असाल. गेल्या दीड दशकात लाखो काय, कोट्यवधी लोकांनी हे अनुभवलं असेल, बघितलं असेल. राजकीय मतं एकमेकांना बोचतील इतकी टोकदार होण्याचा हा कालखंड. राजकीय मतभेदांमुळे नाती बिघडण्याची, मैत्रीत कटुता येण्याची असंख्य उदाहरण आजूबाजूला आहेत, जी कोणत्याही विचारी माणसाला अस्वस्थ करतील. विवाहसंस्थेच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मुलामुलींशी बोलायची मला संधी मिळते. गेल्या काही वर्षांत लग्न जमवताना सातत्याने राजकीय विचारधारा जुळते का, हे बघण्याकडे कल आहे असं मला जाणवतं. एखाद्या व्यक्तीची पूर्ण ओळख त्या व्यक्तीच्या राजकीय विचारधारेनं होऊ शकते का? माणसापेक्षा राजकीय पक्ष वा विचारधारेच्या दावणीला आपण का बांधले गेलो आहोत? 

Loading content, please wait...