Premium|Non-veg Biryani : बिर्याणीची शाही मेजवानी; मटण, चिकन, प्रॉन्सपासून सुरमईपर्यंतच्या लज्जतदार रेसिपी

Prawn Biryani recipe : 'सामिष पदार्थांची राणी' असलेल्या बिर्याणीचे महत्त्व आणि घरी 'कोळीवाडा प्रॉन्स दम बिर्याणी' बनवण्याची खास कृती.
Non-veg Biryani

Non-veg Biryani

esakal

Updated on

मंजिरी हर्षराज कपडेकर

मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणीला खूप महत्त्व आहे. बिर्याणीला ‘सामिष पदार्थांची राणी’ म्हटलं तरी हरकत नाही. कारण नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीला बिर्याणी आवडत नाही, असं सहसा होत नाही. अशा या सर्वांच्या लाडक्या बिर्याणीचे काही छानसे आणि वेगळे प्रकार...

बिर्याणी हा पदार्थ खरंतर वन-डिश मिल! बिर्याणी खूप आवडीनं आणि चवीनं खाल्ली गेली पाहिजे. मला तर नेहमी असं वाटतं, की बिर्याणीसोबत इतर कोणतेही पदार्थ जास्त करू नयेत. आधी मटण किंवा चिकन व चपाती हे पदार्थ न खाता, एखादं छानसं सूप, थोडंसं स्टार्टर खाऊन थेट बिर्याणीवर ताव मारायचा. म्हणजे बिर्याणीची पूर्ण मजा घेता येते. आणि तसंही बिर्याणी करायचा व्यापही मोठा असतो. त्यासाठी कांदा तळणं, कोथिंबीर निवडून घेणं, आलं-लसूण यांची तयारी करणं, भात करून घेणं, मटण-चिकन किंवा व्हेज बिर्याणी असेल तर भाज्या मॅरिनेट करणं अशी बरीच मोठी प्रोसेस असते. त्यामुळे बिर्याणी मनसोक्त खाल्ली तरच मजा येते.

बिर्याणीमध्ये मटण आणि चिकनचं व तांदळाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. बिर्याणी छान ओलसर झाली पाहिजे. त्याच्यामध्ये वरून रस्सा किंवा आमटी घालावी लागता कामा नये. त्यासाठी बिर्याणी करतानाच प्रमाण योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. समजा, तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेणार असाल, तर त्यासाठी पाऊण किलो चिकन किंवा मटण घेतलं पाहिजे. चिकन किंवा मटण हे पदार्थ शिजून कमी होतात आणि तांदूळ शिजून त्याचा भात जास्त होतो. जेव्हा या दोन्हीचं प्रमाण व्यवस्थित होतं, तेव्हा बिर्याणी परफेक्ट ओलसर आणि छान होते. बिर्याणीसाठी तांदूळ खूप चांगल्या पद्धतीचा निवडला गेला पाहिजे. कारण बिर्याणी चांगली होणं हे तुमचा तांदूळ किती छान आहे यावरही अवलंबून असतं. भात किती मोकळा व मऊ झालाय आणि त्याचं शीत कसं अखंड राहिलंय हे महत्त्वाचं असतं. जेवढा तांदूळ चांगला, तेवढी बिर्याणी अतिशय चविष्ट आणि देखणीही होते.

मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणीला खूप महत्त्व आहे. बिर्याणीला ‘सामिष पदार्थांची राणी’ म्हटलं तरी हरकत नाही. कारण नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीला बिर्याणी आवडत नाही, असं सहसा होत नाही. अशा या सर्वांच्या लाडक्या बिर्याणीचे काही छानसे आणि वेगळे प्रकार...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com