अमृता आर्ते
उकडीचे मोदक
साहित्य
एक वाटी तांदुळाची पिठी, १ वाटी साखर किंवा गूळ, एका नारळाचा चव,
२ चमचे तूप, वेलची पूड, तेल, मीठ, सुकामेवा, अर्धी वाटी भाजून कुटलेली खसखस पूड (आवडीनुसार).
कृती
सारण : प्रथम खोवलेल्या नारळाच्या चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधूनमधून हलवावे व सारण भांड्याच्या तळाला चिकटू देऊ नये. सारण शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. नंतर सुकामेवा घालून हलवून सारण एकजीव करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.