Premium|Long Distance Riding Essentials : बायकर होण्याआधी सुरक्षिततेचा 'हा' कानमंत्र जाणून घ्या; रायडिंग गियर्स का आहेत आवश्यक?

Safe Bike Riding Gear : 'मी बायकर आहे' असे अभिमानाने म्हणताना जबाबदारीचे भान राखणे महत्त्वाचे आहे. रायडिंग गियर्सचे महत्त्व आणि प्रवासाला निघण्यापूर्वी बाइकची तांत्रिक तपासणी कशी करावी, याविषयी सोहम धापटे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Long Distance Riding Essentials

Long Distance Riding Essentials

esakal

Updated on

सोहम धापटे

आपले रायडिंग गियर्स आपली त्वचाच आहेत असं समजा! या रायडिंग गिअर्समुळे इजा होण्यापासून संरक्षण तर होतंच, पण गाडी चालवताना हवेच्या माऱ्यानं येणारा थकवाही कमी होतो. ‘माझ्याकडे बाइक आहे’पासून ते ‘मी बायकर आहे’पर्यंतचा प्रवास जितका रंजक आहे, तितकाच तो जबाबदार असणंही महत्त्वाचं आहे.

बाइक घेऊन आपण बाहेर पडलो, जरा शहर मागे टाकलं की जग फक्त एक बॅकग्राऊंड न राहता एक सुंदर अनुभव म्हणून आपल्याला भेटू लागतं. आपल्या शरीराला भिडणारी हवा, चाकाखालून उलट दिशेने धावणारा रस्ता आणि एका लयीत कानावर पडणारा इंजिनचा आवाज... एक वेगळीच जादू आहे या सगळ्यामध्ये. तुम्ही जर नुकतीच बाइक घेतली असेल, तर हा अनुभव घेण्यापासून तुम्ही फार लांब नाही. पण ‘माझ्याकडे बाइक आहे’ ते ‘मी बायकर आहे’ हा प्रवास जितका रंजक आहे, तितकाच तो जबाबदार असणंही महत्त्वाचं आहे. राइडला जाताना केवळ आपली इच्छा सोडता, सोबत आणखी काय काय असायला हवं त्याविषयी...

राइडला जाताना आपण तयार आहोत का, हे पाहायच्या आधी आपली बाइक राइडसाठी तयार आहे का, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. हायवेच्या वेगवान वाहतुकीत गाडी बंद पडणं किंवा घाटामध्ये गाडी ढकलत बसणं हा अनुभव कोणालाही नकोच असतो. हे टाळण्यासाठी तुमच्या ‘प्री-राइड रिच्युअल’मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाइकचं वेळच्यावेळी सर्व्हिसिंग होणं ही तुमची स्टेप वन. प्रत्यक्ष राइडला निघायच्या आधी काय पाहाल? तर राइडच्या एक दिवस आधी टायर्स चेक करून घ्यावेत. टायरमध्ये हवा व्यवस्थित भरलेली आहे का, हे तपासावं. टायरची ग्रिप व्यवस्थित आहे का, हे पाहून घ्यावं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com