

Pu Bha Bhave Adich Akshare
esakal
एका श्वानप्रेमी कलंदरानं, कदाचित त्याला आलेल्या माणसांच्या अनुभवामुळे असेल, त्याच्या प्रशस्त फार्म हाऊसवर विविध ब्रीड्सचे गुण्यागोविंदानं नांदणारे मित्र जोपासले आहेत, त्यांच्यासाठी मोठं हवेशीर डॉग-हाऊस बांधलं आहे, त्यांना मनमोकळं बागडायला भरपूर परिसर आहे; मात्र फार्म हाऊसच्या कंपाउंड गेटवर पाटी आहे... ‘माणसांपासून सावध राहा!’
पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी पु. भा. भावेंची अडीच अक्षरे ही कादंबरी वाचल्याचं आठवतंय. वेगळंच नाव असल्यामुळे सुरुवातीला कुतूहल वाटलं होतं. अडीच अक्षरे म्हणजे ‘कुत्रा’ वा ‘श्वान’ हे वाचताना कळत गेलं. बाळपणापासून ‘चिऊ-काऊ’च्या बरोबरीनं ‘भू-भू’ हा आपला जवळचा मित्र. वॉल्ट डिस्नेनं नव्वद वर्षांपूर्वी मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर्स निर्माण करताना मिकी माउस, डोनाल्ड डक, गुफी यांबरोबर ‘प्लुटो’ हा लांब कानांचा ब्लडहाउंड जातीचा ‘मित्र’देखील निर्माण केला होता. या चौकडीची कार्टुन्स बघून पिढ्यान्पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत, होत आहेत.